मुंबई: "मुंबई पोलीस आता टोप्या, परफ्यूम्स, कप्स, स्वेटर्स यांसारख्या वस्तू बनवणार आहेत आणि त्यांची विक्री सुद्धा करणार आहेत" अशी घोषणा मुंबईचे नवनियुक्त पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी त्यांच्या सोशल मीडियावरून संवाद साधताना सांगितले. या विक्रीमधून येणारा सर्व पैसे हा पोलीस कल्याण निधीसाठीच वापरण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
संजय पांडे यांनी कार्यभार स्वीकारल्यापासून पोलिसांच्या साठी बरेच अभिनव उपक्रम हाती घेण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांच्या तणावमुक्तीसाठी त्यांनी 'संडेस्ट्रीट'चे आयोजन करण्यात आले होते. याचनंतर पांडे यांनी या वस्तूंबद्दल माहिती दिली. मुंबई पोलीस या सर्व वस्तू बनवून मोठ्या शोरूम्स मध्ये त्या विक्रीसाठी ठेवणार आहेत अशी माहिती पांडे यांनी दिली.