नवी दिल्ली: "भारताचा विकासदर जर ८.५ टक्के राहिला आणि जर इतरही सर्व गोष्टी या विकासाला पूरकच राहिल्या तर येत्या ७ ते ८ वर्षांत भारत ५ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनणे शक्य आहे" असे मत नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार यांनी सांगितले. एबीपी नेटवर्कच्या 'आयडीयाज ऑफ इंडिया' या कार्यक्रमात ते बोलत होते. भारत सध्या २.७ टक्क्यांची अर्थव्यवस्था आहे.
गेल्या दोन वर्षांच्या काळात जगातील सर्वच अर्थव्यवस्थांनी वाईट काळ अनुभवला. तसाच तो भारतानेही अनुभवला. सध्या सुरु असलेल्या रशिया- युक्रेन युध्दामुळे किती नुकसान होणार आहे ते अजून स्पष्ट व्हायचे आहे. देशांतर्गत महागाई, चालनवाढीचे संकटसुद्धा आहे. कोरोनाची चौथी लाट आली नाही आणि या सर्व बाह्य गोष्टी सुरळीत झाल्या तर भारताची अर्थव्यवस्था नक्कीच दुप्पट होऊ शकते असे निरीक्षण डॉ. राजीव कुमार यांनी नोंदवले.