रत्नागिरी : भाजप नेते किरीट सोमय्या आणि भाजप नेते निलेश राणे राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांचे साई रिसॉर्ट बेकायदेशीर असून ते तोडण्याच्या मागणीसाठी शनिवारी (दि. २६ मार्च) दापोलीत दाखल झाले आहेत. सोमय्यांना दापोलीत पाय ठेऊन देणार नाही असा ईशारा यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसकडून किरीट सोमय्या यांना देण्यात आला होता. मात्र समर्थकांच्या मोठ्या ताफ्यानिशी ते दापोलीत दाखल झाल्यचे यावेळी दिसून आले. यादरम्यान त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही लक्षकेंद्रीत केलं आहे. 'उध्दव साहेब, तुम्हाला तुमच्या सांगण्यावरून स्वतःला अटक होणार नाही. तुमचा भ्रष्टाचार समोर येईल तेव्हा तुम्हाला अटक करा म्हणून सांगण्याचीही गरज भासणार नाही. त्यावेळी तुमच्याविरोधात कारवाई केल्याशिवाय राहणार नाही.", अशा शब्दात सोमय्यांनी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल चढविला आहे.