७०० लोकं खोटं बोलतील का? ; पल्लवी जोशींचे फारूक अब्दुल्लांना सडेतोड उत्तर

    26-Mar-2022
Total Views |

Pallavi Joshi
 
 
मुंबई : जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्लाच्या वक्तव्यावर अभिनेत्री पल्लवी जोशी सडेतोड उत्तर देत म्हंटले की, "राजकारण हा माझा प्रांत नाही. राजकारण्यांना कसे उत्तर द्यायचे? हे मला माहित नाही. पण एवढे नक्की सांगेन की, आम्ही जो चित्रपट बनवला आहे तो चार वर्ष संपूर्ण अभ्यास करून केलेला चित्रपट आहे. या चित्रपटात आम्ही तेच दाखवलं आहे, जे यादरम्यान आमच्या समोर आले. आमच्याकडे आजही त्या काश्मिरी पंडितांच्या ध्वनिचित्रफीत आहेत, ज्यांनी हे सर्व अनुभवले आहे."
 
 
पुढे त्यांनी म्हंटले की, " पोलिसांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत, ज्या काही घटना चित्रपटात आम्ही दाखवल्या आहेत त्या प्रत्येकाचा पुरावा आम्ही जतन करून ठेवला आहे. एकाच वेळी ७०० लोक खोटं नाही बोलू शकत." असे म्हणत त्यांनी फारूक अब्दुल्लांच्या वक्तव्यावर टीका केली. पुढे त्या असेही म्हणतात की , "काश्मिरी पंडितांबाबत आता असे म्हटले जात आहे की त्यांनी तत्कालीन राज्यपाल जगमोहन यांच्याशी संधान बांधून तेथून पलायन केले. असे लोक करू शकतात पण सर्वच लोक असे कसे करतील? आणि एकाच दिवशी हे सर्व आपले जन्मभूमी-कर्मभूमी सोडून जाण्यासारखे काय कारण असू शकते?"
 
 
 
"काश्मिरी पंडितांच्या झालेल्या निघृण हत्या होण्यापूर्वी दोन दिवस आधी त्यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर दोन दिवस राज्यात कुणाचेही नेतृत्व नव्हते. राजीनामा दिल्यानंतर फारुख लंडनला निघून गेले होते. त्यावेळी जगमोहन यांना राज्यपाल पद दिले होते. परंतु तीन दिवसांनी त्यांनी तो कार्यभार घेतला. कारण खराब हवामान असल्यामुळे कार्यभार स्वीकारण्यासाठी ते येऊ शकले नव्हते." असेही त्यांनी पुढे म्हंटले.