यशवंत जाधवांमुळे आयुक्त इक्बालसिंह चहल 'आयकर'च्या रडारवर

    25-Mar-2022
Total Views |

IT
 
 
मुंबई : स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याशी संबंधित चौकशीत मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना आयकर विभागाने नोटीस पाठवली होती. ३ मार्च रोजी सकाळी ११.३० वाजता हजर राहण्याचे निर्देश चहल यांना देण्यात आले होते. यशवंत जाधव यांच्यावर आयकर विभागाने कारवाई केली होती. त्यात सुमारे तिनशे कोटींची बेनामी संपत्तीही जप्त करण्यात आली. या प्रकरणाशी संबंधित चौकशीसाठी आयुक्तांना बोलावणण्यात आले होते.