लखनऊ: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वतः दूरध्वनी करून निमंत्रण दिल्यामुळे उत्तर प्रदेशाचे माजी राज्यपाल श्री राम नाईक २५ मार्च रोजी होत असलेल्या शपथ ग्रहण समारंभासाठी लखनऊला रवाना होत आहेत. योगी आदित्यनाथ यांच्या नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी हा श्री नाईक यांच्यासाठी एक आगळा- वेगळा अनुभव असेल. ठीक पाच वर्षापूर्वी योगी आदित्यनाथ यांच्या पहिल्या मंत्रिमंडळाला श्री राम नाईक यांनी शपथ दिली होती, तर आताच्या मंत्रीमंडळ शपथग्रहण समारंभात ते पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली नव्या मंत्रिमंडळाने उत्तर प्रदेशाच्या विकासासाठी ऐतिहासिक कार्य करावे, चरैवेति! चरैवेति!!, अशा शुभेच्छा यावेळी श्री नाईक यांनी दिल्या आहेत.