चवदार तळ्याचा सत्याग्रह आणि...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Mar-2022   
Total Views |
 
 
daitva
 
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह समतेसाठी आणि मानवी मूल्यांच्या न्यायासाठी केला. त्या सत्याग्रहाला 95 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने मुंबईतील काही सामाजिक कार्यकर्त्या भगिनींसोबत चवदार तळ्याला भेट दिली. तिकडे अनुभवलेले काही...
 
 
महाडच्या चवदार तळ्यावर अक्षरश: जत्रा भरली होती. दोन दिवस आधीपासून मुंबई-महाड रस्त्यावर गर्दीच गर्दी होती. निळे झेंडे लावलेली वाहने, पांढरे शुभ्र कपडे परिधान केलेले समाजबांधव. विविध सेवाभावी संस्था दि. ६ डिसेंबर रोजी चैत्यभूमीवर ज्या पद्धतीने सेवा उपक्रम राबवितात, तसेच उपक्रम चवदार तळ्याच्या अवतीभवतीही दिसले. महाडच्या आजूबाजूच्या गावातून महिला मंडळ, संस्था यांनी विनामूल्य अन्न आणि पाणी वितरण करण्याचे स्टॉल लावलेले. यामध्ये ‘एक गाव एक पाणवठा आणि एक स्मशान’ असा एकत्रित समरस समुदाय जीवन मांडणारे समरसतेचे कार्य करणारे रा. स्व. संघाचे संघ स्वयंसेवकही भेटले. रिपाइं पक्षापासून बहुजन वंचित आघाडीने मांडव टाकले होते, व्यासपीठ उभारले होते.
 
 
त्या-त्या पक्षाच्या नेत्याचे मोठे बॅनर त्या व्यासपीठावर. यावर बोलताना ‘महार रेजिमेंट’चे माजी सैनिक बाबाजी जाधव आणि त्यांचे मित्र शांताराम सावंत म्हणाले, “इथे जेवढ्या राजकीय पक्षांनी बॅनर लावले आहेत, त्यांच्या बॅनरवर त्या पक्षाच्या नेत्याचा फोटो आमच्या भीमबाबाच्या फोटोसोबत आहे. बाबांच्या बाजूला फोटो छापताना काही वाटत नाही यांना.” माजी सैनिकांचे जे म्हणणे होते, तेच तिचे, उपस्थित असलेल्या सगळ्यांचेच मत होते.
 
 
बाजूलाच समता दलाची परेड सुरू होती. चवदार तळ्यावर झालेल्या गर्दीला सांभाळण्यासाठी ‘समता दल नियोजन’ करत होते. यांना या कामाचे काही मानधन असते का?” तर यावर एका समता दल सैनिकाने उत्तर दिले, “एवढ्या मोठ्या प्रमाणात समाज एकत्रित येतो, तेव्हा समाजाची सुरक्षा आणि काळजी घेऊन जे समाधान मिळते, तेच आमचे मानधन.” त्या युवकाचे उत्तर ऐकून वाटले, ही खरी बाबासाहेबांची पुण्याई.
 
 
भीम जयंती किंवा महापरिनिर्वाण दिनानिमित्त इतकेच काय, भीमा-कोरेगावच्या निमित्तानेही डफली वाजवत क्रांतिगीतांच्या नावावर काहीही बरळणार्‍या लोकांचा घोळका नेहमीच दिसतो. पण इथे ‘डफली गँग’ दिसली नाही. कुठे बरे गेले असतील? कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकवेळ व्हावी, तसे झाले आणि समोरून ते महाशय येताना दिसले. प्रशासनात उच्चस्तरावर काम करणारे उच्चविद्याविभूषित. एका सार्वजनिक कार्यक्रमात आमची भेट झाली होती. माझे आडनाव ‘साळवी’ की ‘साळवे’, हे त्यांनी सहज विचारले होते. बुद्धिवादी लोकांनी सातत्याने आपल्या संपर्कातील लोकांमध्ये विद्रोह पेटवला पाहिजे.
 
 
मागासवर्गीय समाजातील व्यक्ती नसेल तर ती दुष्टच, असे त्यांचे मत. ती व्यक्ती समोरून येत होती आणि त्यांच्या पाठी ५० ते ६० लोकांची मिरवणूक. क्रांतिदिनास बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी गावातल्या लोकांना तयार केले, असे ते सांगत होते. या व्यक्तीला पाहून वाटले की, मुंबईतून ही व्यक्ती खेडेगावात केवळ क्रांतिदिनाची मिरवणूक काढण्यासाठी आली असेल का? शक्यच नाही. इतक्यात एका स्टॉलवर चवदार तळ्याच्या सत्याग्रहावर आधारित असलेले गाणी ऐकू आले. तीन चार गाणी एकली. त्यातली एका गीताचे कडवे -
 
गांधीजींच्या सत्याग्रहाला
चव नाही आली मिठानं
चवदार झाला भीमाचा लढा...
पाण्याच्या एका घोटानं
फक्त अडवलं तुम्हा-आम्हाला
पाखंडी बामन-भटानं...
दुसर्‍या गीताचे कडवे -
चवदार तळ्यात शिरला गं भीम
रूढीचा पदर चिरला गं...
बामणी कावा हेरला दादा
बामणी कावा हेरला...
 
अनेक गीतातून असे चित्र उभे करण्यात आले होते की, चवदार तळ्याचा संघर्ष हा संपूर्ण सवर्ण समाजाविरोधात संपूर्ण असवर्ण समाज यांच्यातील द्वेषमूलक लढा होता. पण हे तर खरे नाही. कारण, डॉ. बाबासाहेबांनी समतेच्या लढाईत जातीपातीची बेडी तोडत सर्व समाजाच्या मानवताशील आणि संवेदनशील सहकार्‍यांचा समावेश केला होता. इतर समाजातील लोक असतीलही मूठभर. पण, ते बाबासाहेबांचे खंदे अनुयायी होते. त्यामुळेच सर्वच सवर्ण समाज हा बाबासाहेबांच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाविरोधात होता, हे म्हणणे चुकीचेच.
 
 
भरीसभर विविध चळवळी आणि राजकीय व्यासपीठावर छोट्यामोठ्या नेत्यांची भाषणे सुरूच होती. आताही मनुवादी समाजात आपल्यावर अन्याय होतो, हे सांगण्यात यातील काही लोक थकता थकली नाहीत. पण, या असल्या भाषणाकडे आणि गाण्याकडे लोकांचे मुळीच लक्ष नव्हते. लोक त्यांचे एकायला थांबतच नव्हती. लोकं चवदार तळ्याकडे जात होते. चवदार तळ्यावर असलेल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याकडे आणि चवदार तळ्याच्या पाण्याकडे अतीव श्रद्धेने पाहत विनम्र अभिवादन करत होते. या साध्याभोळ्या आणि सज्जन शक्तीला समाजात तेढ माजवणार्‍यांशी काही देणेघेणे नव्हते. केवळ आणि केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेमापोटी जमलेला हा जनसमुदाय म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडरांच्या कार्यावर तन-मन-धन ओवाळून टाकणारा कृतज्ञतेचा सागर होता.
 
@@AUTHORINFO_V1@@