मुंबई : "माझ्या घराचे एक एक इंच तपासून घ्या. मी पालिकेच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करण्यासाठी तयार आहे. तपासात काही अवैधता आढळली, तर मला त्याबद्दल नोटीस पाठवा. मी त्याचे योग्य उत्तर देईन.", असे म्हणत मोहित कंबोज यांनी मुंबई महापालिकेकडून होणाऱ्या तपासावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. बुधवारी (दि. २३ मार्च) मुंबई महापालिकेचे अधिकारी मोहित कंबोज यांच्या घराची तसेच इमारतीची तपासणी करण्यासाठी पोहोचले होते.
"कलम ४८८ अंतर्गत पालिकेच्या अधिकाऱ्यांना घराचा एकूण एक कोपरा तपासण्याचा अधिकार आहे. आमचे बिल्डरही त्यांच्या सोबतच आहेत. तपासात काही अवैधता आढळल्यास पालिकेने रीतसर नोटीस पाठवावी. आणि जर नाहीच आढळली तर विषयच संपून जाईल; पालिकेला त्यांचं उत्तर मिळेल.", असेही ते पुढे म्हणाले.