शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यावरून तेलंगणात हाणामारी

निजामाबाद जिल्ह्यातील बोधन शहर कलम १४४ लागू

    20-Mar-2022
Total Views |
           
telangana
 
 
हैद्राबाद: तेलंगणामधील निजामाबाद जिल्ह्यातील बोधन शहरात शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यावरून दोन राजकीय गटांमध्ये हाणामारी झाली. या हाणामारीनंतर बोधन शहरात जमावबंदीचे कलम १४४ लागू करण्यात आले आहे. पोलीस तणाव कमी व्हावा यासाठी दोन्ही गटांमध्ये चर्चा घडवून आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. शहरातील आंबेडकर चौकात शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याची भाजप,शिवसेनेची योजना होती त्याला टीआरएस आणि एमआयएमने आक्षेप घेतला आणि त्यावरून ही हाणामारी उसळली.
 
"टीआरएस आणि एमआयएमचे गुंड छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण रोखण्याचा प्रयत्न करून नासधूस करत आहेत यातून त्यांची सगळे उद्ध्वस्त करण्याची कुटील मानसिकता दिसून येते" असे भाजपचे स्थानिक खासदार अरविद धर्मपुरी यांनी म्हटले आहे.