केंद्र सरकार देणार विवेक अग्निहोत्रींना 'वाय' दर्जाची सुरक्षा

    18-Mar-2022
Total Views |

Vivek



नवी दिल्ली
: 'द काश्मीर फाईल्स' या चित्रपटाची प्रचंड घोडदौड सुरू आहे. पहिल्याच आठवड्यात जगभरात प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने १०७.८० कोटींची कमाई केली आहे. काश्मीरी हिंदूंवर झालेल्या अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या या सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वीच दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींना धमक्या येऊ लागल्या होत्या. सिनेमाचे शुटींग सुरू असतानाच त्यांच्याविरोधात फतवा निघाला होता. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता अग्निहोत्री यांना आता वाय दर्जाची सुरक्षा पुरविण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. केंद्रीय सुरक्षा यंत्रणांच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अग्निहोत्री कुटूंबियांना वाय दर्जाची सुरक्षा पुरविली जाऊ शकते.
द काश्मीर फाईल्स हा भारतातील पहिला असा चित्रपट आहे जो प्रेक्षकांनी उचलून धरल्यानंतर या सिनेमाला स्क्रीन मिळाल्या. कुठल्याही प्रकारच्या विपणनाविना सोशल मीडियावर चालविलेल्या मोहिमेमुळे हा चित्रपट चांगलाच चालला. द कपिल शर्मा शो आणि बॉलीवुड इंडस्ट्रीतून या चित्रपटाविरोधात शीतयुद्ध सुरू झाले होते. आयएमडी या रेटींग देणाऱ्या संस्थेनेही चित्रपटाचे रेटींग घटविल्याचा आरोप झाला होता. कलाकारांनी आता स्वतःच या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी थिएटर्समध्ये हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. अग्निहोत्रींनीही प्रमोशनसाठी विविध ठिकाणी दौरे सुरू केले असल्याने संरक्षण पुरविण्याचा निर्णय घेतला असवा असेही सुत्रांचे म्हणणे आहे.