मुंबई : माटुंगा येथील वीर माता जिजाबाई इन्स्टिट्यूटच्या (व्हीजेटीआय) ‘एन्थुजिया’ उत्सवाच्या दुसर्या दिवशी बुधवारी विविध खेळांच्या स्पर्धांना प्रारंभ झाला. सर्व ११ संघ विजेतेपद पटकावण्यासाठी सज्ज झाले असून यंदाच्या ‘एन्थुजिया’चा विजेता कोण होणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.बास्केटबॉल, खो-खो, थ्रो बॉल, वॉली बॉल, कॅरम, फुटबॉल, टेबल टेनिस अशा विविध खेळांची पहिली फेरी झाली असून यामधील विजेत्या संघांमध्ये गुरुवार, दि. १७ मार्च रोजी पुन्हा लढती होणार आहेत. रविवार, दि. २० मार्च रोजी सर्व स्पर्धांचे अंतिम सामने होतील आणि १४ खेळांच्या लढतीत सर्वात जास्त गुण मिळालेल्या संघाला विजेता म्हणून घोषित केले जाणार आहे. दै. ‘मुंबई तरुण भारत’ आणि ‘महाएमटीबी’ याचे माध्यम प्रायोजक आहेत.