बॉलीवूडच्या ‘फेक फाईल्स’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Mar-2022   
Total Views |

amitabh
 
‘द काश्मीर फाईल्स’ सध्या देशात धुमाकूळ घालत असून चित्रपट पाहून चित्रपटगृहातून बाहेर पडणार्‍या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आणि फक्त पाणी... बॉलीवूडच्या बड्याबड्या ‘खानावळीं’नी चार हात लांब राहून त्यांच्या कुजक्या विचारांचे दर्शन अपेक्षेप्रमाणे घडवलेच. मात्र, या सगळ्यांवर ‘द काश्मीर फाईल्स’ भारी पडला. बॉलीवूडने काश्मीरविषयी खोट्या गोष्टी आणि जी प्रतिमा बिंबवण्याचा प्रयत्न केला, जो काही प्रमाणात यशस्वीदेखील झाला. मात्र, विवेक अग्निहोत्री यांनी हा प्रयत्न हाणून पाडला. ज्यांनी बंदुका हातात घेतल्या ते ‘हिरो’ झाले आणि ज्यांनी बंदुकीच्या गोळ्या शरीरावर झेलल्या, त्यांचा साधा कुणी उल्लेखही केला नाही. जे काही चित्रपट याधी आले, त्यातही काश्मिरी पंडितांना जाणूनबुजून दुर्लक्षित केले गेले. याआधी काश्मीर म्हणजे हसीन वादिया, नंदनवन, निसर्गरम्य पर्यटन स्थळ अशा गोष्टी सांगण्यात आल्या. मात्र, या नंदनवनात कित्येक काश्मिरी पंडितांचे रक्ताचे सडे पाडले गेले, हे कुणीच सांगितले नाही. पंतप्रधान मोदी सहसा चित्रपटांवर बोलत नाही. मात्र, ‘द काश्मीर फाईल्स’वर तोंडसुख घेणार्‍यांना त्यांनी चांगलेच खडसावले. बोलता बोलता त्यांनी आणिबाणी आणि भारत-पाकिस्तान फाळणीवरही अजून सिनेमा बनला नसल्याचे सूचित करत एक ‘हींट’सुद्धा देऊन टाकली. १९८२ साली आलेल्या ‘बेमिसाल’ सिनेमाने काश्मीरविषयी गैरसमज पसरविण्यात कसलीही कसर सोडली नाही. त्यात भारतातील सर्व ‘हिल स्टेशन’चा शोध इंग्रजांनी लावला आणि काश्मीरचा शोध मुघलांनी लावल्याचा जावईशोध लावण्यात आला. कहर म्हणजे, अमिताभसोबत असलेली अभिनेत्री मुघलांवर स्तुतिसुमनांचा वर्षाव करताना दिसली. “मुघलांचा तर काही विषयच नाही, त्यांचे संगीत, चित्रकला आणि आर्किटेक्टर बघा,” असा संवाद त्या अभिनेत्रीच्या तोंडी. मात्र, ‘द काश्मीर फाईल्स’मध्ये “शिव, सरस्वती आणि जिथे पंचतंत्र लिहिले गेले, ते काश्मीर आमचे आहे,” असे अनुपम खेर म्हणतात. यावरून बॉलीवूडमधून काश्मीरविषयी कशा चुकीच्या गोष्टी चित्रित करून देशाची दिशाभूल करण्यात आली, हे स्पष्ट आहे. अशा या ‘द काश्मीर फाईल्स’ने समस्त हिंदूद्वेषी ‘इकोसिस्टीम’ला खतपाणी घालणार्‍या बॉलीवूडच्या ‘फेक फाईल्स’चा पर्दाफाश करत सणसणीत चपराक लगावली आहे!
 
‘जगमोहन थिअरी’चा पर्दाफाश
 
काश्मिरी पंडितांचा आक्रोश ‘द काश्मीर फाईल्स’मधून संपूर्ण देशासमोर मांडला जात असताना हिंदूद्वेषी आणि हिंदूविरोधी ‘इकोसिस्टीम’ खडबडून जागी झाली. ज्या-ज्या वेळी काश्मिरी पंडितांचा 32 वर्षांपासूनचा आक्रोश समोर येतो, त्या-त्या वेळी या ‘इकोसिस्टीम’कडून वेगवेगळ्या थिअरी सांगितल्या जातात. त्यातलीच ‘जगमोहन’ नावाची एक ‘थिअरी’ सध्या लोकांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तत्कालीन जम्मू-काश्मीरचे राज्यपाल हे भाजपचे जगमोहन होते आणि केंद्रातील व्ही. पी. सिंग सरकारलाही भाजपचे समर्थन होते, अशी अर्थसत्य असलेली ही ’थिअरी’ आहे. त्यामुळे ही ’थिअरी’ नेमकी काय आहे आणि ती कशी काश्मिरी पंडितांचा आक्रोश दाबण्यासाठी वापरली जात आहे, हे जाणून घेणे महत्त्वपूर्ण ठरते. मागील वर्षी मे महिन्यात वयाच्या 93व्या वर्षी निधन झालेल्या जगमोहन यांचे पूर्ण नाव जगमोहन मल्होत्रा. त्यांना अत्यंत शिस्तप्रिय प्रशासक म्हणून ओळखले जायचे. दोन वेळा काश्मीरचे राज्यपाल आणि त्यानंतर लोकसभेत राजेश खन्ना यांना धूळ चारून अटल सरकारमध्ये केंद्रीय मंत्रीही बनले. दरम्यान, या ’थिअरी’मध्ये जगमोहन हे रा. स्व. संघाशी संबंधित होते आणि काश्मिरी पंडितांचे पलायन जगमोहन यांच्या कार्यकाळात झाले, या दोन गोष्टी अगदी पद्धतशीरपणे ठसवत काळा इतिहास लपवण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, सत्य वेगळे आहे. व्ही. पी. सिंग सरकारच्या कार्यकाळात जगमोहन यांची दि. १८ जानेवारी, १९९० ला राज्यपाल पदावर नियुक्ती जाहीर झाल्यानंतर कार्यभार सांभाळण्यासाठी ते दि. १९ जानेवारी, १९९० ला ‘बीएसएफ’च्या विमानाने जम्मू येथील राजभवनात पोहोचले. म्हणजे ते दि. १९ जानेवारीला जम्मूत होते, श्रीनगरमध्ये नाही, ज्याठिकाणी काश्मिरी पंडितांचे पलायन सुरू होते. दि. २० जानेवारीला त्यांनी श्रीनगरला पोहोचण्याचा प्रयत्न केला. मात्र, खराब हवामानाच्या कारणास्तव त्यांना पोहोचता आले नाही. २१ तारखेला ते श्रीनगरला पोहोचले, तोपर्यंत बहुतांश काश्मिरी पंडितांनी पलायन केले होते. एकूणच परिस्थितीचे योग्य आकलन न करता ही ‘थिअरी’ चुकीच्या पद्धतीने पसरवली जाते. तसेच जगमोहन यांना खलनायक बनवून खर्‍या खलनायकांना पडद्याआड ठेवण्याचा खटाटोप या ’जगमोहन थिअरी’च्या माध्यमातून केला जातो. जी केवळ आणि केवळ अर्धसत्यच सांगते!
@@AUTHORINFO_V1@@