ठाकरे साहेब, मुंबई ही वरदानच; फक्त विकासाची दूरदृष्टी हवी!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Mar-2022   
Total Views |
 
 
railway
 
 
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतेच बोलताना “दिवसेंदिवस मुंबईची लोकसंख्या वाढत असून आता वाढत्या लोकसंख्येला सुविधा अपुर्‍या पडू लागल्या आहेत,” असे विधान केले खरे. पण, जेव्हा प्रश्न रेल्वेरुळांलगतच्या झोपडपट्ट्यांवर न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाईची वेळ आली, तेव्हा महाविकास आघाडी सरकारनेच त्यात खोडा घातला. त्यामुळे मुंबईतील सोयीसुविधा शाप की वरदान, असा प्रश्न मुंबई पालिकेवर वर्षानुवर्षे सत्ता गाजवणार्‍या ज्या शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांना आज पडला, त्यांनी जरा आलिशान चारचाकी सोडून लोकलमधून प्रवास करावा. बघा कुठे दूरदृष्टी दिसते का...
 
गाच्या इतिहासात २०२० व २०२१ ही वर्षे कोरोनामुळे काळ्या घटनांनी भरली आहेत. हा काळ सर्व जगभर मनस्ताप आणि अंधारीनी भरला होता. भारतीय रेल्वेचाही या कोरोना काळामुळे प्रचंड तोटा झाला. प्रवासातील गर्दी टाळण्यासाठी रेल्वे बंद ठेवाव्या लागल्या. परंतु, आता 2022 सालापासून अनेक ठिकाणी कोरोनापूर्व काळासारखी स्थिती पूर्ववत होऊ लागली आहे.
 
अतिक्रमित झोपडपट्ट्यांचा रेल्वेमार्ग विकासात अडसर
 
उपनगरीय रेल्वेच्या विकासासाठी सर्वांत मोठी अडचण ही झोपडपट्ट्यांची आहे. गेली अनेक वर्षे या झोपड्या रेल्वेच्या हद्दीत ठिय्या देऊन बसल्या आहेत. तेथे झोपडीवासीय अन्न शिजविण्याकरिता शेगड्या पेटवतात, कचरा करतात. या शेगड्यांमुळे रेल्वे हद्दीत आगी लागू शकतात. तसेच,गाड्यांचा वेगही आपसुकच मंदावतो. दि. ३१ डिसेंबर, २०२१ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, रेल्वे हद्दीत (मध्य व पश्चिम रेल्वे) तब्बल २,४६,१९३ चौ.मी. जागेत सुमारे २५ हजारांहून अधिक कुटुंबे झोपड्यांमध्ये राहत आहेत. मार्च २०२० मध्ये साडेतीन लाख चौ.मी. जागेवर २३,२०० अतिक्रमणे होती. त्यातील दहा हजार आक्रमणे रेल्वेकडून हटविण्यात आली आहेत. या सगळ्या झोपड्या अतिक्रमित भूखंडांवर आहेत.
 
रेल्वेलगत असलेल्या रेल्वे जमिनीवरील अतिक्रमणे हटविण्याबाबत सर्वोच्चन्यायालयाकडून दट्टा मिळाल्यानंतर रेल्वेला जाग आली आणि दोन्ही रेल्वेने (मध्य रेल्वे - १३,८३९ झोपड्या व पश्चिम १३,०६० झोपड्या) या २६,८९९ अतिक्रमणांना चार आठवड्यात जागा रिकाम्या करण्याची नोटीस पाठवून आक्रमक पवित्रा घेतला आहे. मुंबईत नगरपालिकेच्या निवडणुकीची पूर्वतयारी सुरू असल्याने राज्यातील मंत्री, खासदार इत्यादींनी रेल्वेच्या या कारवाईला विरोध दर्शविला आहे. या अनधिकृत झोपड्यांना पालिकेकडून अधिकृतपणे पाणी व वीजजोडणी दिली जाते. रेल्वे मंत्रालयाच्या मताप्रमाणे या झोपड्यांचे जर पुनर्वसन करावयाचे असेल, तर ते राज्य सरकारला करावे लागेल. म्हणजे हा पुनर्वसनाचा प्रश्न लवकर न संपणारा आहे. परंतु, सुरक्षिततेचा व रेल्वे-विकासाचा प्रश्न असल्याने महाराष्ट्र सरकारने या झोपड्यांकरिता पर्यायी जागा मुंबई महानगरात वा दुसरीकडे शोधणे जरुरीचे आहे.
 
मुंबई महानगरातील उपनगरीय स्थानकांचा विकास
 
छत्रपती शिवाजी महाराज स्थानकांत अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्यातील काही सुधारणांचा आढावा घेऊया. सीएसएमटीला ‘क्रॉफर्ड मार्केट’कडून प्रवेश - रेल्वेकडून सीएसएमटी स्थानक उपनगरीय व लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या फलांटाकरिता प्रवाशांना सोईचे व्हावे म्हणून ‘क्रॉफर्ड मार्केट’च्या बाजूनेसुद्धा जोडले जाणार आहे. स्वच्छ स्थानकांच्या समुदायात ‘सीएसएमटी’स्थानकाला ‘जनरल मॅनेजर’ यांच्या सप्टेंबरमध्ये ६६व्या समारंभात छत्रपती शिवाजी महाराज स्थानकाला ‘सर्वांत स्वच्छ स्थानक’ म्हणून पुरस्कार दिला गेला. वाखाणण्यासारखी आणखी एक गोष्ट म्हणजे, या वारसा स्थळाच्या स्थानकाठिकाणी एक हजार गाड्यांची व दोन लाख प्रवाशांची रहदारी रोज सुरू असते. गेल्या मार्चमध्ये या स्थानकाला ‘हरित रेल्वे स्थानक’ म्हणून सुवर्ण दर्जाचे प्रशस्तीपत्रक मिळाले आहे. हे स्थान स्वच्छ ठेवण्याकरिता १७५ कामगार स्वच्छता ठेवण्याचे काम रोज करत असतात.
‘सीएसएमटी’ची भव्यता राखण्याकरिता भारतीय रेल्वे (खास करून केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव जातीने लक्ष घालणार) या स्थानकाचा पुनर्विकास करून वारसा स्थळाला शोभेल असा विकास करून ‘हायब्रिड अ‍ॅन्युईटी मॉडेल’ योजनेमधून १,५३० कोटींहून अधिक खर्च करणार व ‘सीएसएमटी’ला रेल-ओ-पॉलिस बनविणार व बांधीव अशा २.५४ लाख चौ.मी क्षेत्रात निवासी व व्यापारी संकुले उभी राहणार आहेत. तसेच मुंबई मनपाकडून याविषयी मार्गदर्शन घेण्यात येईल.
या स्थानकाच्या आवारातील जुन्या-एक्सप्रेस डब्यात ‘रेस्टॉरंट ऑन व्हील’ सेवा लवकरच सुरु होणार आहे. यासाठी फलाट क्र. १८च्या बाहेरील आवारात उपहारगृह उभे करण्यात येणार आहे. यात ४० जण बसू शकतील. या प्रकल्पाला सुमारे ३० लाख रुपये खर्च येणार आहे. अशीच व्यवस्था दुसर्‍या काही स्थानकांवरदेखील सुरु होणार आहे.
या स्थानकावर सर्व क्षेत्र ‘लाईट एमिटींग डायोड’ (एलईडी) दिव्यांनी प्रकाशमान होणार आहेत. ४० टक्के जुने प्रकाशदिवे बदलले जातील. यात ११०० दिवे व त्यात कमीतकमी १६ दशलक्ष रंगीत एलईडी दिवे असतील. सणासुदींच्या दिवसांना वेगळ्या कल्पनेने प्रकाशयोजना बनविली जाईल. अशाच प्रकारची प्रकाशयोजना एलटीटी व दादर स्थानकावर सुद्धा केली जाईल. ‘डिजिटल’ लॉकर बसविण्याचेही रेल्वेचे नियोजन आहे. त्यासाठी २४ तासांकरिता प्रति बॅग ३० रुपये खर्च येणार; नवीन तंत्रज्ञानबद्ध ‘फोर के’ सुरक्षित असे ‘सीसीटीव्ही’ असतील. त्यात ३०० अतिरिक्त कॅमेरे बसविले जातील. त्यातून फलाटावर गर्दी झाली की, ‘सीसीटीव्ही’ भयसूचनेचा इशारा देईल, अशीच ‘सीसीटीव्ही’ व लॉकरची व्यवस्था दुसर्‍या काही स्थानकांवर पण होईल. सरकते जिने पण स्थानकांवर बसविले जातील.
 
‘सीएसएमटी’ व पनवेलला अत्याधुनिक सिग्नलिंग प्रणाली (उइढउ) बसविणार आहेत. त्यातून उपनगरी गाड्यांची फ्रिक्वंसी वाढू शकेल, (चार मिनिटांवरून दोन मिनिटांपर्यंत). सध्या ही प्रणाली १६ गाड्यांकरिता आहे, ती २४ गाड्यांकरिता लवकरच होईल. इतर स्थानकांवर वा मार्गांवर सुधारणा गुरु तेगबहादुर नगर स्थानकावर रेल्वे रुळाखालील ६०० मिमी वाहिनीवरील पाण्याची गळती थांबविल्यामुळे नुकताच भूस्खलनाचा धोका टळला. शीव ते माटुंगा रेल्वे रुळाखाली प्रमाणेच पाणी साचण्याच्या घटना होत होत्या. पालिकेकडून मिठी नदीकडे पातमुख तयार केले जाणार आहे. परंतु, तेथे जलवाहिन्या असल्याने तेथे मायक्रोटनेलिंग पद्धतीने १८०० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकण्याचे ठरविले आहे. पावसाळ्यात सीएसएमटी, मस्जिद बंदर, सँडहर्स्ट रोड स्थानक परिसरातील पाण्याखाली गेला होता. तेथे रेल्वे व पालिका दोघांनी पाणी गळती थांबवण्याचे काम केले. कल्याण, कर्जत/कसारा मार्गावर धोका निर्माण करणारे मोठे र्इेीश्रवशीी होते. ते काढण्याचे काम पावसाळ्यापूर्वी २० दिवसांत केले गेले. सीएसएमटी ते दादर मार्गावरील पाणी साचणार्‍या ठिकाणांचा बंदोबस्त केला. जास्ती ताकदीची ‘हॅलोजन’ प्रकाशयोजना तेथे व भायखळा ते परळ मार्गावर केली. त्यातून काही गळतीचे दोष दिसू शकतील व दुरुस्ती करता येईल. झोपड्यांमधून राहाणार्‍या लोकांनी रेल्वेमार्गावर ठाणे-ऐरोलीला व इतर ठिकाणी घनकचरा वा स्वच्छतागृहे नसल्याने उघड्यावर शौच केले जाते. त्यामुळे रेल्वेचा वेग कमी होतो. म्हणून या झोपडपट्ट्यांना हुसकावयाला हवे व ती जबाबदारी पालिकेचेही आहे. मध्य रेल्वेकडून २०२०-२१ मध्ये १.७ लाख घन. मी कचरा साफ करण्यात आला. ही सगळी कामे उत्पादनशून्य आहेत व पालिकेच्या अपयशातील आहेत, पण ती करायला हवीत.
रेल्वेकडून हरितऊर्जेची कामे पण झाली आहेत. सौर व पवन ऊर्जा प्रणालीमधून वीजनिर्मिती करुन ती आसनगाव, जुनापट्टी, माथेरान, डॉकयार्ड, गोवंडी, चेंबूर, खोपोली, आटगाव येथे २.३१ मेगा वॅट ऊर्जा क्षमतेचे प्रकल्प सुरु केले आहेत. ठाणे, नवी मुंबई, मीरा-भाईंदर येथे वाहतूककोंडी टाळण्याकरिता वसईत ‘अल्ट्रा मॉडर्न लॉजिस्टिक पार्क’ बांधायाचे ठरविले आहे. ठाणे रेल्वे स्थानकाचे अत्याधुनिकरण करण्यात येणार आहे. तसेच देशातील इतर ६० स्थानकांचेही अत्याधुनिकरण केले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून ठाणे-दिवा पाचव्या व सहाव्या मार्गाचे फेब्रुवारीमध्ये उद्घाटन झाले. त्यावेळी ३६ नवीन रेल्वे सेवांची कामे पण सुरू झाली. बहुतेक सर्व गाड्या वातानुकूलित आहेत. शिवाय गोरेगाव-बोरिवली मार्ग दरम्यान उन्नत मार्गिका तयार होणार आहे. त्यामुळे रेल्वेच्या हार्बर मार्ग विस्ताराला वेग येत आहे. या कामासाठी सल्लागाराच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. हार्बर मार्गावर सीएसएमटी ते पनवेल, सीएसएमटी ते अंधेरी, गोरेगाव दरम्यात उपनगरीय रेल्वे धावते. २०१९ पासून गोरेगावपर्यंत धावणारी सेवा बोरिवलीपर्यंत विस्तारीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याच मार्गावर प्रवासी संख्या २०३१ पर्यंत दहा लाखांवर पोहोचणार आहे.
सध्या बोरिवलीपर्यंत पाच मार्ग असून सहावा मार्गही खुला होणार आहे. आणखी हार्बरचे दोन मार्ग झाले की, आठ मार्गिका होतील. हा विस्तार भविष्यात विरारपर्यंत होणे अपेक्षित आहे. तसेच नेरूळ-उरण रेल्वे मार्गिका पुढील सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. रेल्वेकडून एक अ‍ॅप तयार केले जाणार आहे, ज्यातून रेल्वेगाडी नेमकी कोणत्या ठिकाणी आहे वा अडकली आहे, ते मोबाईल फोनवर कळू शकेल. उपनगरीय प्रवाशांना ‘वायफाय’ सेवा मोफत मिळणार आहे. त्यातून त्यांना करमणुकीचा आनंद लुटता येईल. तसेच रेल्वे रुळांजवळ फुलझाडे उगवण्यासाठीची व्यवस्था करण्यात येणार आहे. चर्चगेट ते विरार दरम्यान पश्चिम रेल्वेने प्रवास करणार्‍यांना आधुनिक सुरक्षेचे कवच मिळणार आहे. गर्दीत चेहरा ओळखण्याची क्षमता आणि संवेदनशील ठिकाणच्या गर्दीची सूचना देणारे एकूण २७२९ अत्याधुनिक ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे लवकरच बसविले जाणार आहेत, अशा तर्‍हेने रेल्वेचा विकास सर्वांगीण होत आहे. पण, पालिकेकडून अनेक गोष्टींकरिता सहकार्य मिळाले पाहिजे.
 
@@AUTHORINFO_V1@@