आयपीएलच्या बसेसला मनसेचा दणका! टिम दिल्लीच्या व्हॉल्वोची तोडफोड

मराठी व्यावसायिकांऐवजी दिल्लीतील व्यावसायिकांना कामाचे कंत्राट

    16-Mar-2022
Total Views |

ipl
मुंबई : आयपीएल २०२२ला अवघे काहीच दिवस शिल्लक असताना वादांच्या शृंखलेला सुरुवात झाली आहे. याची प्रचीती मंगळवारी रात्री दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला आली. काही जणांनी पार्किंगमध्ये उभी असलेल्या दिल्ली कॅपिटल्सच्या बसची तोडफोड केली. यासंबधी ५ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाहतूक विभागाचे कार्यकर्त्ये असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व आयपीएल सामने हे महाराष्ट्रात असून सुद्धा वाहतूक व्यवस्थेचे काम मुंबईतील स्थानिक व्यावसायिकांना न देता दिल्लीतील व्यावसायिकांना हे कंत्राट देण्यात आल्याच्या रागाने हे कृत्य केले असल्याचे सांगितले आहे.
 
 
या हल्ल्याबद्दल आयपीसीच्या कलम १४३, १४७, १४९, ४२७ अंतर्गत ५ अज्ञात लोकांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला. त्यानंतर याप्रकरणी कारवाई करत मुंबईच्या कुलाबा पोलिसांनी मनसेच्या वाहतूक शाखेचे उपाध्यक्ष प्रशांत गांधी यांच्यासह चौघांना अटक केली. या हल्ल्यात कोणालाही दुखापत झालेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, वाहतूक कंत्राट महाराष्ट्रातील कोणत्याही कंपनीला देण्याची मागणी मनसेने केली होती. मात्र, तसे न झाल्याने संतप्त मनसेच्या लोकांनी बसची तोडफोड केली. तसेच बसमध्ये आपल्या मागण्यांचे पोस्टर चिकटवून घोषणाबाजी केली.