फडणवीस सरकार आणा, वीज तोडणीच्या संकटातून कायमचे मुक्त व्हा!

    15-Mar-2022
Total Views |

bawankule
मुंबई : "ऊर्जा मंत्रालयाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे पुढील ३ वर्ष वीज तोडू नये, अशी आमची मागणी होती. पण महाविकास आघाडीने लबाडी केली. पुढील तीन महिने वीज तोडणीची कारवाई थांबविण्याचा निर्णय घेतला. हे सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. वीज तोडणीच्या संकटातून कायमचे मुक्त व्हायचे असेल तर महाराष्ट्रात पुन्हा देवेंद्र फडणवीसांचे सरकार आणावे लागेल," असे राज्याचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
 
 
पुढील तीन महिने महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांची वीज तोडणार नसल्याचे जाहीर केले. त्यानंतर आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर टीका केली. "देवेंद्र फडणवीस सरकारने कधीही शेतकऱ्यांची वीज कापण्याचा विचार केला नव्हता. परंतु महाविकास आघाडीचे सरकार आले आणि दुर्दैवाने वीज तोडणी मोहीम राबविण्यात आली. आमच्या काळात ४ हजार ७१५ कोटींच्या नफ्यात असलेल्या विद्युत निर्मिती कंपन्या आज अंतर्गत भ्रष्टाचारामुळे डबघाईस आल्या आहेत. हा तोटा गरीब शेतकऱ्यांच्या खिशातून वसूल करण्यात येतो आहे. शेतकऱ्यांकडून वसुली करण्याचा अधिकार महाविकास आघाडीला नाही. तरीही वीज तोडणीची मोहीम सुरू आहे," असे पुढे आमदार बावनकुळे यांनी म्हंटले.
 
सरकार चावलविण्यासाठी मनगटात ताकद लागते
 
 
सरकार चावलविण्यासाठी मनगटात ताकद लागते. आजच्या सरकारमधील मंत्र्यांमध्ये दूरदृष्टीचा अभाव आहे. विदर्भ - मराठवाडाच्या विकासासाठी काय करता येईल याचा महाविकास आघाडीने विचार करावा. फक्त खानापूर्ती म्हणून सरकार चालवत बसू नये. मंत्री आपल्या मतदार संघासाठीच काम करत असल्याचे जाणवत असून, अर्थसंकल्पात ९५ आमदारांच्याच मतदारसंघाचा फायदा दिसतो. उर्वरित २८८ आमदारांना वाऱ्यावर सोडले असून, मतदारसंघ निवडून घेतले असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले