नवी दिल्ली: रशिया कडून भारताला स्वस्त दरात खनिज तेल विकत घेण्याचा प्रस्ताव देण्यात आली आहे अशी माहिती समोर येत आहे. या व्यवहारासाठी भारतीय चलन रुपया आणि रशियाचे चलन रुबल यांच्यातील विनिमयाचा दर ठरवण्यासाठीही प्रयत्न सुरु आहेत. भारत सरकार या प्रस्तावांवर विचार करत आहे. आपल्या गरजेच्या तब्बल ८० टक्के इतका खनिज तेल आपण आयात करतो. यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर तेलाच्या वाढलेल्या किंमतींनी देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे भारत स्वस्त दरात तेल मिळवण्याच्या प्रयत्नात आहे.
"भारताच्या एकूण गरजेच्या अवघे २ ते ३ टक्के तेल रशियाकडून आयात केले जाते. त्यामुळे जर रशिया आपल्याला स्वस्त दरात तेल देण्यास तयार आहे तर भारत हा प्रस्ताव आनंदाने स्वीकारेन. पण हे तेल भारतात आणायचे कसे, त्यासाठी टँकर्स, तसेच तेल विमा य सर्व गोष्टींची सोया कशी करायची या भारतापुढच्या मोठया अडचणी आहेत" असे भारतीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. जगातील बरेच देश निर्बंधांच्या भीतीमुळे रशियाकडून तेल विकत घेण्यास कचरत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर भारताने रशियाकडून तेल विकत घेण्याचा निर्णय घेतला तर तो जागतिक राजकरांच्या दृष्टीने मोठा निर्णय ठरेल.