मुंबई : ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपट सध्या लोकप्रिय ठरत असल्याचे पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने तीन दिवसांमध्ये ३१.६ कोटींची कमाई केल्याची माहिती आहे. चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट पाहण्यासाठी अनेक प्रेक्षक गर्दी करत आहेत. १९९० च्या दशकातील काश्मिरी पंडितांचे पलायन आणि त्यांची निर्दयी हत्या यावर आधारित हा चित्रपट असून अनेक समीक्षकांनी याची स्तुती केली आहे. येत्या काही दिवसात या चित्रपटाच्या कमाईत आणखी वाढ होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.