मुंबई : नुकतेच उत्तर प्रदेशसह अन्य चार राज्यांच्या निवडणूकींचे निकाल समोर आले आहेत. या निकालांमध्ये शिवसेनेला मोठ्या प्रमाणावर हार पत्कारावी लागली आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करत राऊतांना टोला लगावला आहे.
"उत्तर प्रदेश आणि गोव्याच्या घवघवीत यशा नंतर 'सामना कार' रशिया आणि युक्रेन मध्ये मध्यस्थी साठी रवाना. 'झुकेगा नहीं साला'" असं म्हणत संदीप देशपांडे यांनी संजय राऊत आणि पर्यायाने शिवसेनेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे.
उत्तर प्रदेशात निवडणूकींचे बिगूल वाजल्यापासूनच शिवसेना नेते खासदार संजय राऊत प्रचाराच्या तयारीला लागले होते. संजय राऊत यांनी उत्तर प्रदेशात शिवसेनेला अधिकाधिक जागा मिळाव्या यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली. मात्र, तरीही संजय राऊत आणि शिवसेनेला यश मिळवता आले नाही. यामुळेच आता राऊतांवर अनेक जण टीकास्त्र सोडत असल्याचे चित्र दिसत आहे.