नवी दिल्ली : २० फेब्रुवारी २०२२ रोजी युक्रेन - रशिया युद्ध सुरु झाल्यानंतर युक्रेनमधील भारतीयांना सुरक्षित भारतात आणण्यासाठी भारत सरकारने 'ऑपरेशन गंगा' सुरु केले. युद्धाची चाहूल लागताच भारत सरकारने युक्रेनमधील भारतीय नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली. युक्रेनमधील २२,५०० हुन अधिक नागरिकांना भारतात परत सुखरूप आणण्यासाठी भारत सरकारला यश आले आहे. त्यासाठी आतापर्यंत युक्रेन ते भारत अशा ९० विमानांची सोय करण्यात आली होती.
या ऑपेरेशन दरम्यान पंतप्रधानांनीही भारतीयांच्या सुखरूप परतीसाठी प्रयत्न केले. त्यासाठी तत्परतेने त्यांनी दोन्ही देशांच्या राष्ट्रध्यक्षांशी संवाद ठेवला होता. दर दिवशी या अनुषंगाने उच्चस्तरीय बैठक होत होती. काही मंत्री हे युक्रेनच्या शेजारच्या देशांत वास्तव्यास गेले होते. जेणेकरून सीमारेषेवरून विदयार्थ्यांना सुखरूप बाहेर काढता येऊ शकेन. त्यामुळे हा भारत सरकारची तत्परता, धाडस, देशप्रेम, धोरणात्मक,मुत्सद्दी विजय आहे.