महाशिवरात्रीनिमित्त काशी विश्वनाथ मंदिराला सोन्याचा मुलामा

    01-Mar-2022
Total Views |
kashi



लखनऊ -
भारतातील सर्वात महत्वाच्या हिंदू सणांपैकी एक असलेल्या महाशिवरात्रीच्या निमित्ताने उत्तर प्रदेश राज्यातील काशी विश्वनाथ मंदिर ३७ किलो सोन्याने सजवण्यात आले आहे. मंदिराच्या गाभाऱ्याच्या आतील भिंती सुशोभित करण्यासाठी सोन्याचा वापर करण्यात आला आहे.
अहवालानुसार, एका अनामिक देणगीदाराने काशी विश्वनाथ मंदिराला ६० किलो सोने दान केले होते, त्यापैकी ३७ किलो सोने या उद्देशासाठी वापरले गेले आहे. महाशिवरात्री उत्सवापूर्वी मंदिराचा आतील भाग चकचकीत करण्यासाठी गुजरात आणि दिल्ली येथून विशेष पथकाला पाचारण करण्यात आले होते. आतील घुमटाचा खालचा भाग झाकण्यासाठी २३ किलो सोन्याचा शिल्लक वापर केला जाणार आहे. मंदिराला सोन्याचा मुलामा देण्याचा प्रकल्प तीन टप्प्यांत सुरू करण्यात आला होता. भिंतींना प्रथम प्लास्टिकच्या थराने, नंतर तांब्याच्या पत्र्याने आणि शेवटी सोन्याच्या पत्र्याने झाकण्यात आले. वृत्तानुसार, मंदिराच्या अधिकाऱ्यांनी ६ वर्षांपूर्वी हा प्रकल्प हाती घेण्याची योजना आखली होती. त्यासाठी ४२ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकालाही मंजुरी देण्यात आली. परंतु, वाराणसी येथील आयआयटी (बीएचयू) ने आपल्या अहवालात जुने जुने मंदिर भार सहन करण्यास सक्षम नसल्याचे म्हटल्याने ही योजना थांबवण्यात आली होती.


काशी विश्वनाथ मंदिराच्या एका भागाला सोन्याचे भाग लावण्याचे काम करण्याची ही दुसरी वेळ आहे. १८ व्या शतकाच्या सुरुवातीला, पंजाबचे महाराजा रणजीत सिंग यांनी मंदिराच्या दोन घुमटांना सोन्याच्या मुलामा देण्यासाठी एक टन सोने दान केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी ९०० कोटी रुपयांच्या काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉर प्रकल्पांतर्गत काशी विश्वनाथ मंदिर क्षेत्र २,७०० चौरस फूट ते पाच लाख चौरस फूट विस्तारित केले. भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने काशी विश्वनाथ मंदिर आणि गंगा नदी यांच्यात जलसेन, मणिकर्णिका आणि ललिता घाटांद्वारे थेट संपर्क स्थापित केला.