सिंधुदुर्ग : आमदार नितेश राणे यांना संतोष परब हल्ल्याप्रकरणात न्यायालयिन कोठडी सुनवण्यात आली होती. यासंदर्बात सिंधुदुर्ग उच्च न्यायालयात सुनावणी सुरु होती. बुधवार, दि. ९ फेब्रुवारी रोजी त्यांना अखेर जामीन मंजूर झाला. त्यांचे बंधू निलेश राणे यांनी 'सत्य परेशान हो सकता है, पराजित नही' असे म्हणत पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
"नितेश राणेंना जामीन मंजूर झाल्याचा आनंद आहे. आधी न्यायालयीन कोठडी मग पोलीस कोठडी, त्यानंतर पुन्हा न्यायालयीन कोठडी यावर मी लवकरच बोलीन. ती कोर्टाची एक प्रक्रिया असून त्यात आज जामीन मंजूर झाला. आज आनंदाचा दिवस आहे. 'सत्य परेशान हो सकता है, पराजित नही!' ही म्हण आज सार्थकी लागली. आज या म्हणीचा नेमका अर्थ कळला.", असे निलेश राणे यांनी सांगितले.