उत्तर प्रदेशमध्ये ब्रेन वॉश करून धर्मांतरण करण्याचा प्रयत्न

    09-Feb-2022
Total Views |

up

आजमगढ : उत्तर प्रदेशमधील आजमगढ जिल्ह्यामध्ये धर्मांतरण होत असल्याची घटना समोर आली आहे. विजय विश्वकर्मा व रमेश वर्मा हे या घटनेतील आरोपी आहेत.त्यांना धर्म परिवर्तन करण्याच्या आरोपावरून पोलिसांनी अटक केली आहे. 'बायबल'ची पुस्तके आणि इतर साहित्ये त्यांच्याकडून जप्त करण्यात आली आहेत.
'हिंदू जागरण मंच'च्या सदस्यांनी सांगितले कि 'आम्ही रस्त्यावरून जाताना आम्हाला दिसले कि एका खोलीत ५० लोकांचा 'ब्रेन वॉश' करण्याचा प्रयत्न सुरु होता. ब्रेन वॉश करताना सांगितले जात होते कि जर तुम्ही 'येशू'ला स्वतःला समर्पित केले तर तुम्हला सत्ता,पैसा,समृद्धी सर्व काही मिळू शकेल. हिंदू जागरण मंचच्या सदस्यांनी हि माहिती पोलिसांना कळविली.
कोतवालीच्या इन्स्पेक्टर यांनी माहिती दिली कि तक्रार दाखल केल्यांनतर आम्ही आरोपींना अटक केली आहे. १८८,२९८,५०४,५०६  या कलमांच्या अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला गेला आहे.