राज्यात या शहरांत सातबारा बंद

राज्य सरकारचा मोठा निर्णय

    07-Feb-2022
Total Views |

land record
 
 
 
 
 
मुंबई: राज्यात ज्या शहरांमध्ये सिटी सर्वे झालेला आहे, जिथे कुठली शेतजमीन शिल्लकच उरली नाहीये तिथे सातबारा बंद करून फक्त प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. राज्यातील वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे भूमी अभिलेख खात्याकडून सांगण्यात आले आहे.
 
 
राज्यातील काही जिल्ह्यांत शहरीकरण वाढलेले आहे. त्यामुळे अशा शहरांत शेतजमिनीचा शिल्लक राहिलेल्या नाहीत. तेथील सातबाऱ्यांचं आता प्रॉपर्टी कार्ड मध्ये रूपांतर झालेलं आहे मात्र करचुकवण्यासाठी सातबाऱ्यांचा वापर होतो आहे. असे फसवणुकीचे प्रकार वाढल्यामुळे भूमी अभिलेख खात्याकडून हा सातबारा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अशा फसवणुकीच्या प्रकारांना आळा बसेल अशी अपेक्षा आता व्यक्त केली जाते आहे.