मुंबई: मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबालसिंह चहल मुंबईमहापालिकेचा २०२२-२३ साठीचा अर्थसंकल्प आज सादर करतील. य महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या अर्थसंकल्पाकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. आशियातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळख असलेल्या मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प हा ४० हजार कोटींचा असतो.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प ऑनलाईन सादर केला जाणार आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कुठलीही नवीन करवाढ किंवा शुल्कवाढ न करण्याकडे यंदा कल असल्याचे समजले आहे. या अर्थसंकल्पात सक्षम आरोग्य यंत्रणा, खड्डेमुक्त रस्ते, पूरमुक्त मुंबई यासाठी तरतूद केली जाणार आहे. कोस्टल रोड, विषाणूंचा अभ्यास करण्यासाठी रुग्णालये, खाऱ्या पाण्याचे गोडे पाणी करण्याचा प्रकल्प यांवर विशेष तरतूद केली जाणार आहे. तसेच उत्पन्नवाढीसाठी नवीन स्रोत निर्माण करण्याकडेही लक्ष दिले जाणार आहे.