मुंबई : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती गेल्या तीन दिवसांपासून आझाद मैदान येथे उपोषणाला बसले होते. सोमवार, दि. २८ फेब्रुवारी रोजी अखेर या उपोशषणाला पूर्णविराम दिल्याचे दिसून येत आहे. मराठा समाजाच्या मागण्या राज्य सरकारने मान्य केल्याने हे उपोषण सोडत असल्याचे खासदार संभाजीराजेंनी यावेळी सांगितले.
यावेळी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे हे उपस्थित होते. उपोषण स्थळी असलेल्या व्यासपीठावर मराठा आरक्षमाच्या मागण्यांविषयी चर्चा झाली. त्यानंतर प्रमुख मागण्या मान्य करत असल्याचे एकनाथ शिंदे आणि दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. अखेर संभाजीराजेंनी लहान मुलाच्या हातून रस ग्रहण करून आपले उपोषण थांबविले आहे.