मुंबई : मुंबई महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्ष आणि शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांच्यावर तीन दिवसांपूर्वी आयकर विभागाकडून कारवाई करण्यात आली होती. सोमवार, दि. २८ फेब्रुवारी रोजी आयकर विभागाकडून त्यांच्या घरी छापा टाकण्यात आला. यादरम्यान मोठ्याप्रमाणात कागदपत्रे जप्त केल्याचे दिसून येत आहे. यशवंत जाधव यांच्याशी संबधित इतर कंत्राटदारांवरही छापेमारी करण्यात आली असून तिथूनही काही कागदपत्रे जप्त केल्याचे उघड झाले आहे. यामुळे साधारण १५ कोटींचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.