युद्धशांतीसाठी भारताची मदत घेणाऱ्या युक्रेनने वाजपेयींच्या 'या' कामाला केलेला विरोध

    26-Feb-2022
Total Views |
ukrain




नवी दिल्ली -
युक्रेनचे भारतातील राजदूत इगोर पोलिखा यांनी पंतप्रधान मोदींना रशिया-युक्रेन युद्ध परिस्थितीत वाटाघाटी करण्याच विनंती केली होती. त्यानंतर मोदींनी रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांच्याशी बोलून आपली भूमिका स्पष्ट केली. एकाअर्थी युक्रेनने केलेल्या विनंतील मान देऊन मोदींना पुतीन यांच्याशी चर्चा केली. भारताने युक्रेनसाठी एक पाऊल पुढे टाकले असले, तरी पूर्वी भारत आणि युक्रेन यांच्या संबंध चांगले नव्हते.


युक्रेनचे भारतासोबतचे संबंध पूर्वी चांगले नव्हते. भारताने अणुचाचणी केल्यानंतर युक्रेन हा त्या देशांपैकी एक होता ज्यांनी १९९८ मध्ये या अणुचाचणीला कडाडून विरोध केला होता. १९९८ च्या अणुचाचणीनंतर सुरक्षा परिषदेत भारताच्या निर्णयाचा निषेध केला होता. विशेष म्हणजे १९९८ मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील भारत सरकारने 'ऑपरेशन शक्ती' नावाने पाच अणुचाचण्या करून संपूर्ण जगाला चकित केले होते.


त्यादरम्यान युक्रेनसह अन्य २५ देशांनी भारताच्या अणुचाचण्यांचा तीव्र निषेध करणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या ठरावच्या बाजूने मतदान केले होते. या अंतर्गत, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पारित झालेल्या या ठरावात भारताने अणुचाचण्या थांबवण्याची मागणी केली होती. याशिवाय भारताने अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमता असलेल्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा विकास आणि उत्पादन थांबवावे, अण्वस्त्र कार्यक्रम थांबवावा, असेही या ठरावात म्हटले आहे. या सगळ्यात युक्रेनने संयुक्त राष्ट्राला पाठिंबा दिला होता.