मुंबई: रशिया- युक्रेन युद्धामुळे प्रत्येक क्षेत्रात उलथापालथ बघायला मिळत आहे. उद्योगक्षेत्रसुद्धा यापासून अलिप्त राहू शकलेले नाही. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लाचे व्यवस्थापकीय संचालक एलॉन मस्क यांनाही या युद्धाचा फटका बसला आहे. या युद्धामुळे एलॉन मस्क यांच्या संपत्तीत जबरदस्त घसरण झाली, प्रथमच त्यांची संपत्ती २०० अब्ज डॉलर्सपेक्षा कमी झाली. एवढे नुकसान होऊन सुद्धा एलॉन मस्क हेच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून कायम आहेत.
बुधवारी एलॉन मस्क यांच्या संपत्तीत १३.३ अब्ज डॉलर्स घट होऊन १९८.६ अब्ज डॉलर इतकी झाली आहे. मस्क यांच्या बरोबर जेफ बेझोस यांच्या संपत्तीतसुद्धा या युद्धामुळे घट झाली आहे. जेफ बेझोस यांची संपत्ती ५ अब्ज डॉलरने कमी होऊन १६९ अब्ज डॉलर झाली. टेस्लाच्या शेअर्स मध्ये सात टक्क्यांची तर अमेझॉनच्या शेअर्समध्ये ३.५ टक्क्यांची घसरण झाली आहे. एकूणच या युद्धाचे आर्थिक जगावर गंभीर परिणाम दिसून येत आहेत.