प्रतीक्षानगर आगार खासगी कंत्राटदाराला आंदण?

महिन्याला फक्त दीड हजार भाडे

    24-Feb-2022
Total Views | 73
                             
best
 
 
मुंबई: मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या बेस्टच्या छुप्या खासगीकरणाचे प्रताप उघड झाले आहेत. अवघ्या दीड हजार रुपये भाड्यात बेस्टचे प्रतीक्षा नगर आगार खासगी कंत्राटदाराला देण्यात आले आहे. खासगी कंत्राटदाराला त्याच्या बसेस उभ्या करण्यासाठी, त्यांच्या देखभाल- दुरुस्तीसाठी वापरता येणार आहे. बेस्ट सातत्याने तोट्यात असल्याने संघटनेचा विरोध डावलून बेस्टने भाडेतत्वावर बस दाखल करायला सुरुवात केली होती, आता संपूर्ण आगारचा भाडेतत्वावर देण्याचा प्रकार बेस्ट उपक्रम करत आहे.
 
 
प्रतीक्षानगर आगारातील ३४ स्वमालकीच्या बसेस आणि ७६ चालक- वाचकांची बदली अन्य आगारांमध्ये करण्यात आलेली आहे. तेथून सुटणाऱ्या बसेसचे मर सुद्धा बदलण्यात आल्याने प्रवाशांची गैरसोय होते आहे. गेली काही वर्षे बेस्ट सातत्याने तोट्यात असल्याने दैनंदिन खर्च सुद्धा परवडेनासा झाला आहे. त्यामुळे बेस्टचे खासगीकरण करण्याचा हा डाव असल्याचे 'आपली बेस्ट आपल्यासाठीच' या संघटनेचा आरोप आहे.
 
 
या संघटनेचे अध्यक्ष रुपेश शेलटकर यांनी याबद्दल तीव्र निषेध नोंदवला आहे. "प्रतीक्षानगर आगार अशा प्रकारे भाडेतत्वावर देण्याच्या निर्णयाचा आम्ही निषेध करतो. या आगाराबरोबरच ओशिवरा, मालवणी, सांताक्रूझ या आगारांनाही भाडेतत्वावर देण्याचा बेस्टचा डाव आहे" असा आरोप शेलटकर यांनी केला आहे.
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121