विजयादशमीचा उत्सव साजऱ्या होणाऱ्या म्हैसूर पॅलेसमध्ये नमाज पठण

    22-Feb-2022
Total Views |
namaz


बंगळूरू -
कर्नाटकातील अंबा विलास पॅलेसमध्ये म्हणजेच प्रसिद्ध म्हैसूर पॅलेसमध्ये काही व्यक्ती नमाज अदा करताना दिसत आहेत. पॅलेसला भेट देणाऱ्या पर्यटकांनी या ठिकाणी नमाज पठण करणाऱ्या लोकांचा व्हिडीओ शूट केला आहे. यामध्ये काही व्यक्ती पॅलेसच्या आवाराज सार्वजनिक स्वरुपात नमाज पठण करताना दिसतात.



म्हैसूर पॅलेस हे भारतातील सर्वात लोकप्रिय पर्यटन आकर्षणांपैकी एक आहे. याला अंबा विलास पॅलेस म्हणून देखील ओळखले जाते, जे म्हैसूर राज्यातील वोडेयार महाराजांचे आसनस्थान होते आणि देशातील सर्वात मोठ्या राजवाड्यांपैकी एक आहे. मैसूरू अरमाने हे त्याचे स्थानिक कन्नड नाव आहे. चामराजा वोडेयार यांची थोरली मुलगी जयलक्षमन्नी हिच्या लग्नात १८९७ मध्ये लाकडाने बांधलेला जुना वाडा जळून खाक झाला आणि १९१२ मध्ये ४२ लाख रु. खर्च करून पुन्हा हा पॅलेस बांधण्यात आला. म्हैसूर पॅलेस संकुलात बारा हिंदू मंदिरे आहेत. सर्वात जुने मंदिर हे १४ व्या शतकात बांधले गेले आहे, तर सर्वात अलीकडील मंदिर हे १९५३ साली बांधण्यात आले आहे.


हा राजवाडा दसरा उत्सवासाठी प्रसिद्ध आहे. विजयादशमीचा सण याठिकाणी १० दिवस "म्हैसूर दसरा" म्हणून साजरा केला जातो. दसरा उत्सवादरम्यान प्रकाशित म्हैसूर पॅलेस जगभरातील पर्यटकांना आकर्षित करतो. अशी पार्श्वभूमी असताना याठिकाणी काही व्यक्तींचा गट नमाज पठण करताना दिसला. राडवाड्याला भेट देण्यासाठी गेलेल्या गुजराती पर्यटकांच्या नजरेत हा नमज पठण करणारा गट पडला. त्यांनी हात पाय धुतले आणि त्यानंतर पॅलेसच्या आवारातच नमाज पठणास सुरुवात केली. सार्वजनिक ठिकाणी नमाज पठणास बंदी असताना त्यांनी हे काम केले.