दादरमध्ये पालिकेचे दुहेरी धोरण ?

    21-Feb-2022
Total Views |
 
 
bmc
 
 
मुंबई : कोरोना संसर्गामुळे सार्वजनिक ठिकाणी तोंडावर मास्क लावणे हे शासनाकडून बंधनकारक करण्यात आले आहे. परंतु याबाबत दादरमध्ये पालिका नक्की कोणते धोरण अवलंबत आहे हा प्रश्न नागरिकांना पडला आहे. दादर स्थानकाच्या पूर्वेला तोंडावरील मास्क थोडा जरी खाली असेल किंवा फक्त पाणी पिण्यासाठी जरी मास्क खाली केला तरी पालिकेच्या क्लीनअप मार्शल्सकडून दंड आकारण्यात येतो. पण दादर स्थानकाच्या पश्चिमेला मात्र अशाप्रकारची कोणतीही कारवाई करण्यात येत नाही.
 
दादर स्थानकाबाहेरचा पूर्वेकडील भाग हा पालिकेच्या फ/ उत्तर विभागात मोडतो आणि पश्चिमेकडील भाग हा ग/ उत्तर विभागात येतो. पण हे दोन्ही विभाग महापालिकेच्याच अंतर्गत येतात. तरीही पूर्वेकडे पालिकेचे क्लीनअप मार्शल हे लोकांकडून दंड वसूल करत आहेत तर पश्चिमेला मात्र पालिकेचा एकही क्लीनअप मार्शल दिसतही नाही.
 
त्यामुळे दादरमध्ये मास्कबद्दल पालिकेकडून दुहेरी धोरण आखण्यात येत आहे का ? दादर पूर्व आणि पश्चिम हे दोन्ही विभाग पालिकेच्या अंतर्गतच येतं असतानाही पालिकेकडून हा दुजाभाव का केला जात आहे ?, असे प्रश्न नागरिकांकडून विचारले जात आहेत.