पुणे : एका २४ वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर ती गरोदर राहिली. यानंतर जबरदस्तीने तिचा गर्भपात करून त्या तरुणीला जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोप शिवसेना कामगार नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर करण्यात आला. यानंतर त्यांच्यावर गुन्हादेखील दाखल करण्यात आला.
मात्र, 'एकीकडे फरार सेनेच्या गटनेत्यांकडून पिडीत तरुणीला धोका असताना दुसरीकडे पुण्यातच महिला सक्षमीकरणाचा कार्यक्रम घेणाचा शिवसेनेचा ढोंगीपणा. यामध्ये तरुणीच्या न्यायाची मागणी होणार का?' असा प्रश्न भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये विचारला आहे.
भाजप नेते केशव उपाध्ये यांनी ट्विट केले आहे की, "पुण्यातील शिवसेनेचा बलात्कारी उपनेता रघुनाथ कुचिक फरार असल्याने पीडितेच्या जीवाला धोका आहे. तर दुसरीकडे त्याच पुण्यात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना, महिला सक्षमीकरणासाठी शिबीर घेत आहे. म्हणजे किती हा ढोंगीपणा? कुचीकला तातडीने अटक करुन या पीडित महिलेला न्याय देण्याची मागणी या कार्यक्रमात होणार का?" असे खोचक ट्विट केले आहे.