आसामच्या १ किलो चहाला ९९ हजारांची बोली! : कसा आहे लाखमोलाचा चहा?

    16-Feb-2022
Total Views |
                         
tea center
 
 
 
 
 
गुवाहाटी: गुवाहाटी येथील चहा लिलाव केंद्रात सोमवारी झालेल्या लिलावात गोल्डन पर्ल टी ला विक्रमी बोली लावली गेली. एका किलोसाठी ९९,९९९ रुपयांची बोली लावली गेली. दोन महिन्यांत दुसऱ्यांदा चहा पावडरीसाठी विक्रमी बोली लावली गेली आहे. डिसेंबर २०२१ मध्ये गोल्डन बटरफल्य टी साठी ९९,९९९ इतकीच बोली लावली गेली होती. तेव्हा ती कुठल्याही चहासाठी लावली गेलेली तोपर्यंतची सर्वाधिक बोली होती. आसाममधील दिब्रुगढ जिल्यातील नाहोरचुकवारी येथील कारखान्यात गोल्डन पर्ल टी बनवला जातो.
 
 
 
चांगल्या प्रतीचा चहा जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोचावा यासाठी जगभरामध्ये चहा लिलाव केंद्रे उघडण्यात आलेली आहेत. या ठिकाणी विविध चहा कंपन्या त्यांच्या चहाचे नमुने पाठवतात. या लिलावात ज्या चहाला सर्वात जास्त किंमत मिळते तो चहा सर्वोत्कृष्ट चहा म्हणून जाहीर केला जातो. ही बोली फक्त एक किलो चहासाठीच्या नमुन्यासाठीच लावली जाते आणि खरेदीदारास सर्वोत्कृष्ट चहाचा ग्राहक म्हणून घोषीत करण्यात येते.