भुंकतोय जोमानं, अन् भिजलाय घामानं... : गोपीचंद पडळकर

    16-Feb-2022
Total Views |

Gopichand Padalkar
 
 
 
मुंबई : खासदार संजय राऊत यांना आमदार गोपीचंद पडळकर यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेवरून त्यांच्या शैलीत टोला लगावला आहे. भुंकतोय जोमानं, अन् भिजलाय घामानं..., असे म्हणत पडळकरांनी राऊतांवर शेलक्या भाषेत टीका केली आहे.
 
 
 
दादरच्या शिवसेना भवनमध्ये खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. मात्र, शेवट येतायेता त्यांची घाई आणि गोंधळ पाहायला मिळाला. पत्रकार परिषदेच्या शेवटी त्यांना घाम फुटला होता. तसेच, प्रश्न उत्तराची गरज नाही म्हणत त्यांनी संवाद न साधता परिषद थांबवली.
 
 
एवढेच नव्हे तर, मोहित कंबोज यांच्यावर आरोप करण्याआधी ते 'पत्रकार परिषद संपली' म्हणून घोषणा केली होती. पण, त्यांनी पुन्हा पत्रकारांसमोर बसून मोहित कंबोज यांच्याविरोधात तक्रारींचा पाढा वाचला. या पत्रकार परिषदेआधी 'साडे तीन' नेत्यांची नावे बाहेर येतील, असा दावा केल्यानंतर प्रत्यक्षात असे कोणत्याही नेत्यांची नावे घेतली नाहीत. फक्त भाजप नेत्यांवर आरोप करून त्यांनी ही पत्रकार परिषद थांबवली.
 
 
 
गेले काही दिवस ईडीने केलेल्या कारवाईमध्ये अनेक शिवसेना तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांना फटका बसला आहे. तसेच, संजय राऊत यांच्या निकटवर्तीयांवरही ईडीची धाड पडली. यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये मोठी आरोपप्रत्यारोपाची लढाई पाहायला मिळाली. तसेच, भाजप नेते किरीट सोमय्या यांनीदेखील त्यांच्यावर तसेच शिवसेना मंत्री अनिल परब यांच्यावर आरोप करण्यात आले. अखेर संजय राऊत हे बहुचर्चित पत्रकार परिषद घेत काहीतरी मोठा गौप्यस्फोट करणार अशी चर्चा होती. प्रत्यक्षात मात्र फुसका बार निघाल्याचे मत विरोधकांनी केले आहेत.