"फ्लावर नहीं, फायर है में; झुकेगा नहीं!" : मोहित कंबोज

    15-Feb-2022
Total Views | 372

Kamboj  
 
 
 
मुंबई : खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांचे खंडन करत मोहित कम्बोज भारतीय यांनी जोरदार पलटवार केला. राऊतांच्या दबावापुढे आपण झुकणार नसल्याचे म्हणत मै झुकेगा नही, अशा 'पुष्पा', स्टाईलने त्यांनी उत्तर दिले. दि. १५ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ४ वाजता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. ही परिषद शिवसेना भवन येथे घेण्यात आली होती. यावेळी त्यांनी भाजपच्या मोहित कंबोज यांचा उल्लेख केला. मोहित कंबोजला ओळखत नसल्याचं त्यांनी सांगितलं. यावर उत्तर म्हणून मोहित कंबोज यांनी संध्याकाळी ६.१५ वाजता पत्रकार परिषद घेऊन राऊतांवर चांगलाच पलटवार केला आहे. "संजय राऊतांना गरज असायची तेव्हा मीच त्यांना पैशांची मदत केली होती.", असं ते म्हणाले.
 
 
 
मोहित कंबोज पत्रकार परिषदेत म्हणाले की, 
 
"संजय राऊत हे दरवर्षी माझ्याघरी गणपतीला यायचे. गेल्या सप्टेंबर महिन्यात सुध्दा ते आले होते. संजय राऊतांना जेव्हा जेव्हा पैशांची अडचण आली, तेव्हा तेव्हा मी त्यांना पैशांची मदत केली होती. कदाचित त्यांचा स्मृतिभंश झाला असावा. राऊतांनी माल फडणवीसांचा ब्ल्यॅू हर्ट बॉय म्हटलं. माझ्यासाठी ही एक गर्वाची गोष्ट आहे. पण माझा माझा राऊतांना असा प्रश्न आहे की, ते उद्धव ठाकरे यांचे ब्ल्यॅू हर्ट बॉय आहेत की शरद पवार यांचे? त्यांनी आपली लॉयल्टी कुणाशी आहे हे आधी स्पष्ट करावं."
 
 
 
"आजच्या या फ्लॉप पत्रकार परिषदेत राऊतांच्या कोणत्याच बड्या नेत्याचे समर्थन नव्हते असे दिसून आले. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी १५ तारखेच्या पत्रकार परिषदेनं भाजपच्या लोकांना घाम येईल असं सांगितलं होतं. पण या पत्रकार परिषदेनंतर राऊतांनाच घाम आला."
 
 
 
"कोणतीही पत्रकार परिषद घेण्यापूर्वी राऊतांना योग्य अभ्यास करायची गरज आहे. गुरू आशिष आणि राकेश वाधवानकडून १ लाख ६५ हजार चौ.फुटांची १२ हजार कोटींची जमीन १०० कोटी रुपयांत घेतल्याचा आरोप राऊतांनी माझ्यावर केला. मला राऊतांना हे विचारायचंय की, १२ हजार कोटींची जमीन (१० लाखांपेक्षा जास्त रुपयांच्या चौ.फुटांची जमीन) मुंबईत सोडा संपूर्ण जगात तरी कुठे आहे का? तुम्ही पण मिया-नवाबप्रमाणे हर्बल वनस्पती खाऊन पत्रकार परिषदेला सुरूवात केली का? तुम्हाल नेमकं सांगायचंय तरी काय?"
 
 
 
"माझ्या कंपनीने २०१० मध्ये गुरू आशिषकडून जमीन विकत घेतली होती. त्यात मी दिलेले पैसे पूर्णतः बुडाले. त्याची एफआयआरची कॉपी सुध्दा माझ्याकडे आहे. त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार होते. त्यांनी पत्रावाला चाळ प्रकरणात घोटाळा केला होता. २०१५ मध्ये गुरू आशिषवर आम्ही तक्रार नोंदवली होती. प्रविण राऊतने संजय राऊतच्या मदतीने जो पत्रावाला चाळचा घोटाळा केला, त्याची तक्रार ही मी केलेली. यावरून राऊतांना कदाचित असं म्हणायचं असेल की मीच माझ्यावर स्कॅम केला."
 
 
 
"राऊतांनी माझ्या अनेक कंपन्यांची नावं घेऊन त्यात पैसा कुठून येतो असा प्रश्न उपस्थित केला. मी राऊतांना खुलं आवाहन देतो की, त्या संबंधीत प्रत्येक चौकशीला मी तयार आहे."
 
 
 
'ग्रँड हयात' हॉटेलशी राऊतांचा संबंध काय? सोन्याची तस्करी करणाऱ्या राजकुमार गुप्ता आणि वंदना गुप्ता परिवाराशी त्यांचा संबंध काय? सध्या चाललेल्या दाऊदच्या विषयासंदर्भात ते गप्प का? त्यविशायी केव्हा बोलणार? पुण्यात पाटकरला ब्लॅकलीस्ट केलं असताना मुंबईत टेंडर कसं देण्यात आल? असे अनेक प्रश्नही कंबोज यांनी पत्रकार परिषदेत राऊतांना विचारले आहेत.
 
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121