नवी दिल्ली: कर्नाटकातील हिजाब वरून उसळलेल्या वादावर रविवारी जम्मू आणि काश्मीर च्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी भाजप वर टीका केली. त्यांनी या वादाला उत्तरप्रदेशच्या निवडणुकांशी जोडले. "आता हा वाद संपणारच नाही, मुसलमानांच्या सर्वच खुणा भाजप आता पुसून टाकेल " असे मुफ्ती यांनी म्हटले. मुफ्ती पुढे म्हणाल्या की "भारतीय मुसलमानांना आता फक्त भारतीय होणं पुरेसे नाही आता त्यांना भाजपचे समर्थक सुद्धा बनावं लागेल." पीडीपी पार्टीच्या श्रीनगरमधील एका पत्रकार परिषदेत मुफ्ती बोलत होत्या. तेव्हा त्यांनी भाजपवर हिजाब मुद्द्यावरून टीका केली. "भारतात उसळलेल्या या वादावर आंतरराष्ट्रीय पातळीवर खूप बोललं जात आहे, हा फक्त उत्तर प्रदेशमधील निवडणुकांसाठी मुद्दाम तयार केलेला विषय आहे आणि याच्या माध्यमातून हे आमच्या सर्वच प्रतिकांवर हल्ले करतील" असेही मुफ्ती यांनी सांगितले.
या पुढे त्यांनी कलम ३७० च्या वादावर सुद्धा भाष्य केलं. "कलम ३७० हा खूप जटील मुद्दा आहे, हे कलम रद्द केल्यामुळे परिस्थिती सुधारण्याच्या ऐवजी बिघडलीच आहे. याच मुद्द्यावरून भारताला एक दिवस पाकिस्तान सोबत चर्चा करावीच लागेल असे त्यांनी या मुद्द्यावर बोलताना सांगितले.