समीर वानखेडेंना मोठा दिलासा : नवाब मलिकांना बसला झटका!

    12-Feb-2022
Total Views |

Sameer Wankhede Nawab Malik
 
 
मुंबई : राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याविरूध्द काही दिवसांपूर्वी गंभीर आरोप केले हाते. मात्र शुक्रवार, दि. ११ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने वानखेडेंना अनुसूचित जाती-जमातीचेच असल्याचे सांगत मोठा दिलासा दिला आहे. तसेच वानखेडेंना लक्ष करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या सूचनाही आयोगाकडून देण्यात आल्या आहेत. यामुळे नवाब मलिकांना आता मोठा झटका बसला आहे.   
 
 
 
"समीर वानखेडे हे याच जातीचे असून त्यांच्या विरोधात या प्रकरणी एससी आणि एसटी कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करता येणार नाही. तसेच महाराष्ट्र सरकारने तयार केलेले विशेष तपास पथकही तातडीने रद्द करावे", असे आयोगाने दिलेल्या आदेशात म्हटले आहे. "पोलीस चौकशीच्या नावाखाली वानखेडेंना कोणी त्रास देऊ शकत नाही तसेच नेमकी काय कारवाई करण्यात आली होती? याचा अहवाल एफआयआर कॉपीसह सात दिवसात सादर करावेत.", असे आदेशही आयोगाने दिले आहेत.