टाटा सन्सच्या एक्झिक्युटिव्ह चेअरमनपदी पुनर्नियुक्ती झालेल्या 'एन चंद्रशेखरन' यांचा जीवनप्रवास

शेतकऱ्याचा मुलगा ते टाटा समूहाचा अध्यक्ष "एन चंद्रशखेरण"

    12-Feb-2022
Total Views |

tata.jpg


मुंबई :
टाटा या १५० वर्षांहून अधिक इतिहास असलेल्या कंपनीचे आतापर्यंत ८ अध्यक्ष झालेले आहेत. परंतु या कंपनीच्या इतिहासात फक्त ८ वे अध्यक्ष हे पारशी समाजातले नव्हते आणि त्यांच्या परिवारातील कोणीही उद्योजक नव्हते, ते एका शेतकऱ्याच्या घरी जन्माला आले होते.ते आहेत 'एन चंद्रशेखरन'. २०१७ पासून या विशाल कंपनीची धुरा यशस्वीरीत्या सांभाळणाऱ्या 'एन चंद्रशेखरन' यांची नुकतीच पुढील ५ वर्षांसाठी पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे.एन चंद्रशेखरन (N Chandrasekaran) यांची पुन्हा एकदा टाटा सन्सच्या एक्झिक्युटिव्ह चेअरमनपदी निवड करण्यात आली आहे. ही निवड पुढील पाच वर्षांसाठी असल्याचं कंपनीच्या कार्यकारी बोर्डने स्पष्ट केलं आहे.


टाटा सन्सच्या कार्यकारी बोर्डाची काल बैठक झाली. त्यामध्ये एन चंद्रशेखरन यांच्या गेल्या पाच वर्षाच्या कार्यकालाचा आढावा घेण्यात आला. एन चंद्रशेखरन यांची गेल्या पाच वर्षातील कामगिरी लक्षात घेता त्यांना पुन्हा एकदा मुदत वाढ देण्यात आली आहे. मिठापासून विमानापर्यंत सर्व क्षेत्र व्यापलेल्या टाटा ग्रुप अंतर्गत टाटा सन्सच्या एक्झिक्युटिव्ह चेअरमनपदी एन चंद्रशेखरन यांची पुनर्नियुक्ती आल्याने ही त्यांच्या कामाची पोचपावती असल्याचं सांगितलं जातं.


टाटा सन्सच्या कालच्या बैठकीला रतन टाटा यांना विशेष आमंत्रित करण्यात आलं होतं. रतन टाटा यांनी एन चंद्रशेखरन यांच्या गेल्या पाच वर्षातील कामगिरीवर समाधान व्यक्त केलं आणि पुढच्या पाच वर्षांसाठी त्यांना मुदत वाढ देण्यात यावा असा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला टाटा सन्सच्या कार्यकारी बोर्डने मंजुरी दिली. टाटा सन्सच्या एक्झिक्युटिव्ह चेअरमनपदी काम करताना आपल्याला समाधान वाटलं आणि पुढील पाच वर्षांसाठी पुन्हा एकदा संधी दिल्याबद्दल आपण संस्थेचं आभार मानतो अशी प्रतिक्रिया एन चंद्रशेखरन यांनी व्यक्त केली.


सायरस मिस्त्री आणि रतन टाटा यांच्यात होत असणाऱ्या मोठ्या वादाच्या पाश्र्वभूमीवर २०१७ मध्ये ' 'एन चंद्रशेखरन' यांच्या हाती हि सूत्र आली आणि मागील ५ वर्ष उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे पुन्हा एकदा पुढील ५ वर्षासाठी टाटा सन्सचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले आहे.


जाणून घेऊयात कोण आहेत एन चंद्रशेखरण ?


एन चंद्रशेखरण यांचा जन्म १९६३ मध्ये तामिळ शेतकरी कुटुंबात झाला.घरातील परिस्थिती हलाखीची होती.आपल्या भावांबरोबर ते दरररोज ३ कि.मी अंतर चालून शाळेत जायचे. त्यानंतर त्यांनी त्रिचीच्या इंजिनीअरिंग कॉलेजमधून कॉम्पुटर अँप्लिकेशनमध्ये मास्टर केले.१९८७ मध्ये ते 'टाटा कन्सल्टन्सी सर्विस'(TCS)चे इंटर्न म्हणून कार्य करत होते. २००९ मध्ये ते 'टाटा कन्सल्टन्सी सर्विस'(TCS) मध्ये सीईओ म्हणून रुजू झाले. त्यांची काम करण्याची पद्धत आणि त्यांचे नेतृत्व शैली उत्कृष्ट आहे.एन चंद्रशेखरण हे टाटा समूहाचे पहिले असे अध्यक्ष आहेत ज्यांच्या परिवारातील कोणीही उद्योजक नव्हते. सायरस मिस्त्री यांच्या अध्यक्षपदाच्या काळात ज्यावेळेस 'टाटा' करोडोंचे नुकसान भोगत होते. त्यावेळेसही 'टाटा कन्सल्टन्सी सर्विस' उत्तम काम करत होती.आजही भारतीय मार्केटमध्ये रिलायन्स कंपनीनंतर TCS हि मोठी कंपनी आहे. याचे कारण 'एन चंद्रशेखरण' यांचे नेतृत्व मानले जाते. यांना सर्वत्र प्रेमाने 'चंद्रा' म्हणून बोलाविले जाते. 'एन चंद्रशेखरण' यांना रनींग करायला फार आवडते. ते अनेक मॅरेथॉन मध्येही सहभाग घेत असतात.त्यांच्या म्हणण्यानुसार व्यवसाय करणे हे मॅरेथॉन रेस पळण्यासारखेच आहे.त्यांची पुनर्नियुक्ती होणे आणि रतन टाटा यांनी स्वतः त्यांच्या नावाचे समर्थन करणे हेच त्यांच्या कामाची पोचपावती आहे. २६ जानेवारी २०२२ रोजी त्यांना भारताचा उच्च नागरी सन्मान 'पदमभूषण' देऊन गौरविण्यात आले.


२०१७ मध्ये जेव्हा त्यांना अध्यक्षपद दिले गेले त्यावेळेस सायरस मिस्त्री आणि रतन टाटा यांच्यातला वाद सुरु होता. तो वाद सायरस मिस्त्री यांच्या कार्यकाळात टाटा कंपनीचे झालेले करोडोंचे नुकसान आणि त्यांच्या व्हिझनमध्ये असलेले फरक यामुळे तो वाद सुरु होता. २०१६ ला रतन टाटा यांनी सायरस मिस्त्रीला अध्यक्षपदावरून काढले आणि पुढील अध्यक्ष निवडण्यापर्यंत रतन टाटा यांनी अध्यक्षपद भूषविले. २०१७ मध्ये एन चंद्रशेखरण यांना अध्यक्ष म्हणून निवडले गेले.

एन चंद्रशेखर यांचे व्हिजन आणि 'वन टाटा' योजना



११० दशलक्ष डॉलरची टाटा कंपनी अनेक क्षेत्रात विस्थारली गेली आहे. टाटा समूह हा सॉफ्टवेअर सेवा, ग्राहकोपयोगी वस्तू, धातू, ऑटोमोबाईल्स आणि दागिन्यांपासून एरोस्पेस आणि संरक्षणापर्यंत विविध कंपन्यांचे मिश्रण आहे.एन चंद्रशेखरण यांनी या कंपनी सुरळीत चालाव्यात यासाठी 'वन टाटा' योजना आखली. यानुसार समूहामध्ये होत असणारा संवाद त्यांची कार्यपद्धती सुलभ करा, कंपन्यांमध्ये समन्वय निर्माण करा आणि टाटा वृद्धिंगत करत जा.हि योजना आकार घेताना दिसत आहे. टाटा समूहाचा इतका मोठा विस्तार एन चंद्रशेखरण यांच्या या दूरदृष्टीमुळे वाढत चालला आहेच त्याचबरोबर त्यावरील नियंत्रणही सोपे होत जात आहे. त्यामुळे मागील ५ वर्षात टाटांच्या प्रत्येक कंपनीने सातत्याने ग्रोथ दाखविली आहे. त्याचबरोबर अनेक नवीन प्रतिभेला संधी देण्याचे काम वारंवार एन चंद्रशेखरण यांनी केले आहे. टाटांच्या कर्मचाऱ्यांकडून वारंवार सांगितले जाते कि एन चंद्रशेखरण त्यांच्यासाठी २४ तास उपलब्ध असतात. चंद्रा यांनी २०१७ मध्ये पदभार स्वीकारल्यापासून टाटा समूहाच्या कंपन्यांचे बाजार भांडवल दुप्पट झाले आहे.
 
येत्या काळातील 'एन चंद्रशेखर' यांच्यासमोरील समस्या



टाटा समूहाने अनेक योजना भविष्य काळासाठी बनविल्या आहेत. टाटा समूहाने नुकतेच सिंगापुर ऐलरलाईन यांच्याबरोबर एअर इंडियाचा ताबा घेतला आहे.टाटांनी घेतलेली हि मोठी रिस्क आहे असे मांडले जात आहे. एअर इंडियाचे व्यवस्थापन सध्या मोडकळीच्या अवस्थेत आहे. त्यास सुरळीत करणे हे एक मोठे टास्क टाटा समूहासमोर आहे. टाटा समूहाचे ऍमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या मोठ्या कंपनीना टक्कर देणारी ऑनलाईन ग्रोसरी मार्केट निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. टाटा समूहाचा इलेकट्रोनिक विभागही मोठ्या प्रमाणावर विविध प्रकल्प हाती घेत आहे. टाटा सोलर पॉवर हि मोठ्या प्रमाणावर भविष्याच्या ऊर्जा टंचाईवर मात करण्यासाठी काम करत आहे.