'अल्लाहू अकबर' असा नारा देणाऱ्या मुलीला काँग्रेस आमदार झीशान सिद्दीकीकडून आयफोन

    12-Feb-2022
Total Views |

zeeshahn


बंगळुरू :
 कर्नाटकात सुरू असलेल्या हिजाबच्या वादामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या मुस्कान खान या विद्यार्थ्यानीवर मुस्लिम संघटनांनी बक्षिसे आणि भेटवस्तूंचा वर्षाव केला आहे. मुस्कान खान पीईएस कॉलेजमध्ये शिकते. ११ फेब्रुवारी रोजी कॉलेज कॅम्पसमध्ये हिजाब परिधान करून 'अल्लाह हू अकबर'चा नारा दिल्यानंतर अनेक इस्लामिक गटांकडून तिला 'शूर मुलगी' ही पदवी दिली जात आहे. आता महाराष्ट्राची राजधानी मुंबईतील वांद्रे येथील काँग्रेस आमदार झीशान सिद्दीकी यांनीही मंड्या शहरातील मुस्कानच्या घरी जाऊन तिच्या कामाचे वर्णन अत्यंत साहसी असे केले आहे. झीशान सिद्दीकी यांनी मुस्कानला एक आयफोन आणि एक स्मार्टवॉचही भेट दिली आहे.
 
एका ट्विटमध्ये झीशान म्हणाला, “कर्नाटकातील वाघिणीला भेटा, जी तिचा हिजाब घालण्याचा अधिकार रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या फॅसिस्टांच्या विरोधात खंबीरपणे उभी होती. बंगळुरू ते मंड्या १०० किमी पार करुन मी धाडसी मुलगी मुस्कान खान आणि तिच्या कुटुंबाला भेटलो,आणि तिच्या शौर्याचे कौतुक केले!”झीशान खानने आपल्या ट्विटमध्ये राहुल गांधी, प्रियांका गांधी, राज्यसभा खासदार केसी वेणुगोपाल, शशी थरूर, काँग्रेस आमदार बाळासाहेब थोरात, इम्रान प्रतापगढ़ी आणि श्रीनिवास बीव्ही आणि इतर काहींना देखील टॅग केले आहे.

 
काँग्रेस आमदार जीशान यांनी मुस्कानच्या पोस्टमध्ये अनेक नेत्यांना टॅग केले


झीशान सिद्दीकीने एक व्हिडिओ ट्विट करत म्हटले आहे की, 'मी मंड्यामध्ये मुस्कान खानला भेटलो. मुस्कान खान तुम्हाला माहित असेलच. मुस्कान जी आज देशाची आणि कर्नाटकची सिंहिणी म्हणून ओळखली जाते. मुस्कान जी तिच्या कॉलेजमध्ये जाण्याचा प्रयत्न करत असताना काही गुंडांनी तिला अडवण्याचा प्रयत्न केला. त्यांना हिजाब न घालण्यास सांगण्यात आले. मला त्या लोकांना सांगायचे आहे की तुम्ही कोणाला हिजाब घालण्यास सांगणारे नाही. मुस्कान जी प्रमाणे आमच्या सर्व बहिणी त्यांना पाहिजे ते परिधान करू शकतात. हिजाब घालणे हा त्यांचा घटनात्मक अधिकार आहे.



zishan
व्हिडिओमध्ये तो पुढे म्हणाला, “मी आज मुस्कान जी आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला भेटलो. तिला भेटून मला खूप आनंद झाला. मी तिला सांगितले की संपूर्ण देशाला तिचा अभिमान आहे. मी तिला प्रोत्साहन दिले. भविष्यातही गरज पडल्यास मोठ्या भावाप्रमाणे मदत करेन, अशी ग्वाही मी दिली.

 
जमियत उलेमा-ए-हिंदने यापूर्वीच ५ लाखांचे बक्षीस दिले आहे


या महिन्यात ९ फेब्रुवारीला जमियत उलेमा-ए-हिंदचे एक शिष्टमंडळ मुस्कान खानच्या घरी गेले होते. तेथे या शिष्टमंडळाने मुस्कानच्या वडिलांना ५ लाख रुपयांचा डिमांड ड्राफ्ट सुपूर्द केला.काही दिवसांपूर्वी मुस्कान खानचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. व्हायरल व्हिडिओमध्ये ती स्कूटीवरून कॉलेज कॅम्पसमध्ये येते. त्यावेळी ती हिजाबमध्ये होती आणि तिने हेल्मेट घातले नव्हते. याला तेथे उपस्थित इतर विद्यार्थ्यांनी विरोध केला. विद्यार्थ्यांच्या हातात आणि गळ्यात भगवे फलक होते. मुस्कान खानच्या वतीने अल्ला हु अकबर आणि इतर विद्यार्थ्यांच्या वतीने जय श्री रामच्या घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर मुस्कानने जय श्री रामचा नारा देणाऱ्या विद्यार्थ्यांना बाहेरचे म्हटले होते. या घटनेनंतर मुस्कानला तालिबान आणि पाकिस्तानचाही पाठिंबा मिळाला.