ताडदेव आग दुर्घटना: इमारतींतील रहिवासी पालिकेमुळे बेघर

    10-Feb-2022
Total Views |
 
 
bmc
 
 
 
मुंबई: ताडदेव येथील आगीच्या दुर्घटनेतील राशिवाश्यांवर पालिकेकडून नव्या वीज वाहिन्यांचे काम पूर्ण झालेले नसल्याने भाड्याच्या घरात राहायची वेळ आलेली आहे. ताडदेव येथील 'सचिनम हाईट्स' या इमारतीला २२ जानेवारी रोजी लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू झाला होता.



लागलेली आग इतकी भीषण होती की त्यात इमारतीच्या वीज वाहिन्यांचे जाळे पूर्णपणे जाळून गेले होते. ही यंत्रणा नव्याने उभारण्यासाठी एक ते दोन महिन्यांचा काळ लागणार आहे. त्यामुळे तेथील रहिवासी इतरत्र आसरा शोधत आहेत. नानाचौक येथील भाटिया रुग्णालयासमोर ही सचिनम हाईट्स ही वीस माजली इमारत आहे. आगीच्या दुर्घटनेच्या दिवसापासून तेथील रहिवाश्यांना इमारतीत प्रवेश बंदी आहे. यामुळे रहिवासी दुसरीकडे राहत होते. काही रहिवाश्यांचे नातेवाईक अजूनही रुग्णालयात उपचार घेत आहेत. सोसायटी स्थापन झाल्याने आता या सोसायटीच्या कुठल्याच कामात विकासक लक्ष घालत नाही. शेवटी आता रहिवाश्यानीच पुढाकार घेऊन काम करण्याचे ठरवले आहे.
 
 
मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी या आगीची चौकशी करण्याचे काम परिमंडळ २ च्या उप- आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीला दिले होते. आगीचे नेमके कारण काय होते, इमारतीच्या आराखड्यात कोणते विनापरवाना बदल करण्यात आले होते का? यांची चौकशी करून १५ दिवसांत अहवाल देण्यास सांगितले होते. समितीने अहवाल तयार केला असून लवकरच तो पालिका आयुक्तांसमोर सादर होणार असल्याची माहिती मिळत आहे.