पवईत रुग्णालयाचा खर्च ३२२ कोटी, सल्लागारांना ६ कोटी

    10-Feb-2022
Total Views |
                         
bmc
 
 
मुंबई: पवई चांदिवली भागात ३२२ कोटींचे नवीन रुग्णालय मुंबई महानगर पालिका बांधणार आहे. त्यासाठी सल्लागार म्हणून नेमलेल्या कंपनीला फक्त सल्ला देण्याचे ६ कोटी पालिका मोजणार आहे. पालिकेची ४ मोठी, १७ उपनगरीय तसेच विशेष रुग्णालये सुद्धा आहेत. पण पूर्व उपनगरांमध्ये वाढती लोकसंख्या पण रुग्णालयांची कमतरता ही परिस्थिती लक्षात आल्यावर हे रुग्णालय उभारण्याचा निर्णय झाला आहे.
 
 
पवई चांदिवली भागातील संघर्ष नगर मध्ये हे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. रुग्णालय उभारणीसाठी आरोग्य तज्ज्ञांपासून विविध क्षेत्रातील तज्ज्ञांची आवश्यकता असते. त्यामुळे ज्याच्या कडे हे सर्व तज्ज्ञ लोकांची उपलब्धता असेल त्याच्याकडेच हे काम दिले जाणार आहे. या सल्ल्यांसाठी एकूण रकमेच्या १.८७ टक्के म्हणजे ६ कोटी दोन लाख चौदा हजार रुपये पालिका देणार आहे.