हैदराबाद : एका कंपनीने स्टार्ट अप म्हणून सुवर्ण एटीएमचा प्रयोग केला आहे. भारतातले पहिले आणि जगातले पहिले रिअल टाईम सुवर्ण एटीएम हैदराबादेत सुरू झाले आहे. याआधी दुबईमध्ये सोन्याच्या खरेदीसाठी एटीएम सुरू झाले आहेत. या एटीएममधून तुम्हाला क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डचा वापर करुन सोनं खरेदी करता येणार आहे. गोल्डसिक्का (Goldsikka Limited) कंपनीने हैदराबादमध्ये सोन्याचं एटीएम बसवलं आहे. यामधून एटीएम सोन्याची नाणी काढता येतील.
या गोल्ड एटीएममधून 0.5 ग्रॅम पासून 100 ग्रॅमपर्यंत सोन्याची नाणी खरेदी करु शकता. यामध्ये तुम्हाला आठ पर्याय देण्यात आले आहेत. या गोल्ड एटीएममधून 0.5 ग्रॅम पासून 100 ग्रॅमपर्यंत सोन्याची नाणी खरेदी करु शकता. यामध्ये तुम्हाला आठ पर्याय देण्यात आले आहेत. या एटीएममधून तुम्ही 0.5 ग्रॅम, 1 ग्रॅम, 2 ग्रॅम, 5 ग्रॅम, 10 ग्रॅम, 20 ग्रॅम, 50 ग्रॅम आणि 100 ग्रॅम अशाप्रकारे सोन्याची नाणी काढू शकता. गोल्डसिक्का प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने हैदराबाद स्थित स्टार्टअप कंपनी ओपनक्यूब टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडच्या साहाय्याने 3 डिसेंबर रोजी पहिलं गोल्ड ATM लाँच केलं आहे. हे भारतातीलच नाही तर जगातील पहिलं रिअल-टाइम गोल्ड एटीएम आहे.
गोल्डसिक्का ची सुरक्षा...
सोने असलेल्या एटीएमसाठी अत्याधुुनिक यंत्रणा वापरण्यात आली आहे. या एटीएम यंत्रातच कॅमेरा बसवलेला आहे. त्याशिवाय बूथमध्ये आणखी दोन कॅमेरे ग्राहकाच्या हालचालींवर नजर ठेवतील. तसेच एटीएमच्या बाहेर तीन कॅमेरे असतील. एटीएम फोडायचा प्रयत्न केल्यास अलार्म वाजून बूथ लॉक होणार असून पोलिस ठाण्यांची तत्काळ मदत उपलब्ध होईल.