‘स्टार्टअप’ विश्वाला आकार देणारे मंदार जोशी

    09-Dec-2022   
Total Views |
 

mandar joshi
 
 
 
‘स्टार्टअप्स’ हे भारताच्या उद्योग क्षेत्राचे भविष्य. आज अनेक ‘स्टार्टअप्स’ उदयाला येत असून चांगल्या पद्धतीने आपला व्यवसाय करताना दिसतात. त्यातून बर्‍यापैकी प्रगतीही साधतात. पण, या ‘स्टार्टअप्स’च्या संपूर्ण विश्वाला आकार देण्यासाठी, या नव्याने उदयाला येणार्‍या उद्योजकांना मार्गदर्शन करण्यासाठी काम करणे गरजेचे आहे आणि ती काळाची गरजसुद्धा आहे. पण, नेमके हेच काम करण्यासाठी फार कमी जण पुढाकार घेतात. पण, ‘पुणे इंटरनॅशनल सेंटर’चे मंदार जोशी यांनी मात्र यासाठी सक्रिय पुढाकार घेतला आहे. त्याचाच या लेखात घेतलेला सविस्तर आढावा.
 
 
रतात ज्याला ‘स्टार्टअप’चे विश्व किंवा ‘स्टार्टअप्स’ची चळवळ असे म्हंटले जाते, ती खरंतर फारच उशिराने सुरु झाली. अमेरिकेसारख्या तंत्रज्ञप्रगत, भांडवलसमृद्ध अशा देशातील कॅलिफोर्निया येथेच ही चळवळ जोमाने सुरू झाली. बरेच नवउद्योजक या संकल्पनेने भारावून जाऊन पुढे येऊ लागले. नवनवीन संकल्पना राबवू लागले. या अशा प्रोत्साहनाने अनेक उद्योग उभे राहिले आणि आजही ही प्रक्रिया निरंतर सुरुच आहे. यामुळे बर्‍याच मोठ्या उद्योजकांनीही या ‘स्टार्टअप्स’ना मार्गदर्शन करण्याचे ठरवले. त्यांनी पुढे या ‘स्टार्टअप्स’ना मार्गदर्शन तर केलेच, पण तितकेच या नव्या उद्योगांमध्ये भांडवलाची गुंतवणूकसुद्धा करण्यास सुरुवात केली. 2008च्या जागतिक मंदीनंतर तर या ‘स्टार्टअप्स’ना अधिकच गती प्राप्त झाली. भारतात 2012च्या सुमारास या ‘स्टार्टअप्स’बद्दल चर्चा काहीशी सुरु झाली होती. पण, हळूहळू उद्योगविश्वानेही ‘स्टार्टअप्स’ना मोठे करण्यास सुरुवात केली. 2014 नंतर भारत सरकारने पुढाकार घेऊन, या ‘स्टार्टअप्स’ना मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देण्यासाठी एक योजनाच तयार केली आणि त्यांना सरकारी भांडवल उपलब्ध करुन देण्याचीही सोय केली. तेव्हापासून भारतात हे ‘स्टार्टअप्स’चा जो बोलबाला सुरु झाला, तो आजतागायत कायम आहेच.
 
 
मुळात ‘स्टार्टअप’ म्हणजे एक उद्योगच. असे कधीच होत नाही की, मनात संकल्पना आली आणि त्यातून उद्योग उभा राहिला. यासाठी असावी लागते ती जिद्द, चिकाटी, मेहनत करण्याची क्षमता आणि सातत्याने करावा लागतो तो यशाचा पाठलाग. आपण ‘स्टार्टअप’बद्दल नेहमी बोलतो. ते कसे विकसित होत आहेत वगैरे यावरही चर्चा रंगतात. पण, या ‘स्टार्टअप्स’ना एकत्र करून मार्गदर्शन करण्याचे काम करणारे विरळाच. हेच काम करत आहेत, ‘पुणे इंटरनॅशनल सेंटर’चे मंदार जोशी.
 
 
2008 साली ज्यावेळी पुणे-महाराष्ट्रात ‘स्टार्टअप इकोसिस्टीम’ नव्हती, त्यावेळी ’टाय’ ही संस्था अमेरिकेत सुरू होती. भारतातल्या उद्योजकांनी अमेरिकेमध्ये गेल्यावर ही ‘इकोसिस्टीम’ तिथे सुरु केली. एवढ्या मेहनतीनंतर तिथे पोहोचल्यावर मार्गदर्शन करणारे कुणीच नव्हते. त्यामुळे, हे सर्व उद्योजकांनी एकत्र येऊन ’द इंड्स इंटरप्रेनर्स’ नावाची संस्था सुरु केली. 1993 मध्ये सुरू झालेली ही ‘इकोसिस्टीम’ आपल्याकडे 2012 मध्ये आली. या उद्योजकांना त्यावेळेस काहीच आधार नव्हता.
’इंडस’ म्हणजेच भारतातून शिकून गेलेले. या 10 ते 12 जणांच्या समूहाने मुंबई, बंगळुरू येथून सुरुवात करून छोट्या-छोट्या शहरांमधून जागतिक स्तरावर 61 चॅप्टरर्स सध्या 23 देशांत पसरवले. या संकल्पनेला प्रचंड प्रतिसाद मिळत गेला. सर्वप्रथम ’आयटी’ क्षेत्रातून सुरुवात झाली आणि मुंबई, पुणे, दिल्ली, बंगळुरू यांसारख्या शहरात प्रसार होत गेला.
 
 
‘स्टार्टअप’ सुरु होण्याआधी ‘सपोर्ट सिस्टीम’ फारशी नव्हती. व्यवसायासंबंधी मार्गदर्शन मिळवण्यासाठी एखाद्या ‘ऑर्गनायझेशन’पर्यंत जावे लागायचे. याच गोष्टींमध्ये बदल होणे गरजेचे होते. वैयक्तिकरित्या कोणीही पुढे येऊन लगेच व्यवसाय उभारू शकत नाही. सहकार्‍यांची सोबत आणि मार्गदर्शन असावेच लागते. यामुळे काम करताना संस्था दीर्घकाळ चालण्याची शक्यतादेखील जास्त असते. इथे एखादी नवीन कल्पना घेऊन आल्यानंतर दहा ते 12 वर्षांचा ‘प्लान’ देण्याचा आग्रह असल्याचे मंदार जोशी सांगतात. कारण, केवळ दोन ते तीन वर्षांत ‘ऑर्गनायझेशन’ दीर्घकाळ चालण्याच्या शक्यता फारच कमी असतात. अजून काही वर्षे दिल्यानंतर तेथील ‘इकोसिस्टीम’ अधिक मजबूत होते. त्यामुळे हा ‘प्लान’ करणे गरजेचे आहे. त्यानंतर या संस्थेकडून सुरक्षेच्या हेतूने पेटंट’साठीदेखील मदत केली जातो. सुरक्षा ही अधिक महत्त्वाची असते. अशावेळी आपल्याला स्वतःपेक्षा आपल्या स्पर्धकाच्या ‘प्रॉडक्ट’विषयी माहिती असणे गरजेचे असते. मंदार जोशी सांगतात की, “जर आपलं त्यांच्या हालचालींवर लक्ष्य नसेल, तर आपण कुठेतरी मागे पडू, अशी भीती असते. यामध्ये युवकवर्गासाठी एक मूलभूत गोष्ट अशी की, तुम्ही फक्त मोठ्या नोकर्‍यांचे स्वप्न पाहू नका, तर रोजगार निर्मितीचे स्वप्न पाहा. यासाठी ‘इकोसिस्टीम’ची जाणीव असणे महत्त्वाचे आहे. ‘इकोसिस्टीम’ शिवाय जगणे फारच कठीण आहे. रतन टाटा म्हणतात, ance and walking single you will not cover.''त्याप्रमाणे सहयोग महत्त्वाचा असतो.”
 
 
सहयोगामुळे संघर्ष करत ‘इकोसिस्टीम’मध्ये टिकून राहणं सोप्पं होतं. ज्याप्रमाणे 20 वर्षांपूर्वी आपण बोलायचो की, ‘इकोसिस्टीम’पेक्षा आपण 50 वर्षं मागे आहोत. पण, तसे चित्र आज नाही. आता जवळजवळ आपण त्यांच्या बरोबरीने आहोत. अमेरिकेहून जे भारतात आलेले आहेत, ते ‘इकोसिस्टीम’ मुळेच. त्यानंतर ‘इकोसिस्टीम’ला सरकारी मान्यता प्राप्त झाली. आणि नवनवीन ’स्टार्टअप प्रोजेक्ट्स’ सुरु झाले.
 
 
2014-15 मध्ये ’डीआयपीपी’ 300 स्टार्टअप्स होते. ’डीआयपीपी’ने प्रोत्साहन देऊन, ’इकोसिस्टीम’ वाढवून हा आकडा आता सात हजारांवर आणलेला आहे. ही संख्या सात हजारांहून अधिक आहे. पण, नोंदणीकृत सात हजार इतकी आहे. हे सर्व शक्य झालं ते ‘इकोसिस्टीम’मुळे. त्यांनी नियमांचे पालन करून योग्यरीत्या मार्गदर्शन केलं. ही ‘इकोसिस्टीम’ National Security, Energy Environment, Climate, Economic Dialouge वर लक्ष देते. शासनाच्या विविध योजनांमुळे याचा अधिक विस्तार होण्यास मदत होत आहे. तरुणांच्या अभ्यासक्रमातदेखील सुरुवातीपासूनच यावर भर दिला पाहिजे. अभ्यासक्रमाच्या तिसर्‍या वर्षात ’ई-सेल’, ‘आयडिएशन’, ’गो टू मार्केट स्ट्रॅटेजी’ देण्याऐवजी पहिल्या वर्षापासूनच अभ्यासायला दिले पाहिजे. कारण, तिसर्‍या वर्षात येईपर्यंत अधिकतर विद्यार्थ्यांचा कल हा नोकरीकडे असतो. त्यामुळे ‘स्टार्टअप्स’कडे तरुणवर्ग कसा वळेल, हे पाहिले पाहिजे. विद्यार्थ्यांच्या मते, आपण जास्त काम केले, तर आपण जास्त पुढे जाऊ, असं चित्र असतं. अशावेळी तरुणांनी ’वर्क-लाईफ बॅलन्स’ लक्षात घेणं फार गरजेचे आहे. कोरोना महामारीनंतर घरून काम करणं सुरु झालं होतं. त्यामुळे ‘वर्क-लाईफ बॅलन्स’ कुठेही दिसून येत नव्हतं. अधिक काम, कौटुंबिक चीडचीड यामुळे सर्वांना ऑफिसमध्ये जाऊन आठ तास काम करून येणं, अधिक सोयीस्कर वाटत होत. यावेळी ‘मेंटल वेलनेस’चे अधिक ‘स्टार्टअप्स’ पुढे आले.
 
 
या संपूर्ण ‘इकोसिस्टीम’चा, ’वर्क-लाईफ बॅलन्स’चा स्टार्टअप्सना नक्कीच फायदा होत आहे. मंदार जोशी यांनी केलेले मार्गदर्शन आणि सांगितलेला अनुभव व्यवसाय उभारणीसाठी नक्कीच मार्गदर्शक ठरेलच. ‘स्टार्टअप्स इकोसिस्टीम’मुळे एकापेक्षा अनेक गोष्टींवर काम करणे आपल्याला शक्य होईल. एका व्यवसायाच्या बळावर आपण अजून अनेक व्यवसाय जोडू शकतो आणि एकत्र मोठे करू शकतो. हा या ‘स्टार्टअप इकोसिस्टीम’चा भाग आहे आणि अशा प्रकारची ‘इकोसिस्टीम’ बनवणे, ही काळाची गरजेच आहे.
 
 
(शब्दांकन : साक्षी कार्लेकर)
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

हर्षद वैद्य

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये उपसंपादक (वेब आणि प्रिंट) म्हणून कार्यरत. रुईया महाविद्यालयातून गणित या विषयात पदवीचे शिक्षण घेतले. आर्थिक क्षेत्राशी संबंधित वृत्तांकन आणि लेखन. भारतीय संगीत, इतिहास या विषयांमध्ये विशेष रस. महाविद्यालयीन स्तरावर विविध स्पर्धांमध्ये प्राविण्य. अर्थशास्त्र विषयात महाविद्यालयात संशोधन केले आहे. शैक्षणिक, सेल्स आणि मार्केटिंग क्षेत्राचाही अनुभव.