मायरा मिश्राचे बालिश कृत्य; सोशल मीडियावर व्हायरल !

    07-Dec-2022
Total Views |

मायरा मिश्रा
 
 
 
 
 
 
मुंबई : मुंबईतील राजभवन हे महाराष्ट्राच्या राज्यपालांचे अधिकृत निवासस्थान आहे. सध्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. एका एनजीओच्या काही महिला राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनात आल्या होत्या. संबंधित महिला निमंत्रित होत्या. या महिलांबरोबर अभिनेत्री मायरा मिश्रा ही देखील आली होती. राज्यपालांच्या दालनात मोबाईल फोन वापरण्यास परवानगी नसताना देखिल नियमांचे उल्लंघन करुन अभिनेत्री मायरा मिश्राने फोटो काढला.
 
 
राज्यपाल दालनात येण्याआधी मायरा मिश्राने मोबाईलमधून राज्यपालांच्या खूर्ची मागे उभ राहुन काही फोटो काढले. त्यानंतर ते फोटो तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हायरल केले. तिच्या ह्या व्हायरल फोटोशूटमूळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. राज्यपाल हे संविधानिक पद आहे. राजभवनात असे फोटो काढुन राजभवनाचा अपमान केला आहे.
 
 
 
फोनचा वापर करण्यास परवानगी नसताना देखिल असा पोरकटपणा करुन फोटो काढल्याने राजभवनाची प्रतिमा मलिन होत असल्याचे तेथील काही वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितलं. मायरा मिश्राच्या या बालिश वृतीवर सर्वत्र निषेध केला जात असून लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.