डॅा. गजानन रत्नपारखींकडुन आदिवासी बालकांना मायेची उब ६०० कुटुंबांना मोफत ब्लॅंकेट वाटप

ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांना व बांधवांना मोफत सतरंजी , ब्लँकेट वाटपाचा कार्यक्रम

    07-Dec-2022
Total Views |

आदिवासी
 
 
 
 
 
मुरबाड : समस्त दैवज्ञांची मातृसंस्था असलेल्या अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नति परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ.गजानन रत्नपारखी संस्थपित " गुरुकृपा हार्ट फाऊंडेशन" च्या सौजन्याने व अभादैसपच्या संयुक्त विद्यमाने दि.५ डिसेंबर २०२२ रोजी आश्रम शाळा ,तळवली, मुरबाड येथे संपन्न झाला.सुमारे ६०० कुटुंबांनी याचा लाभ घेतला.
 
 
 
 
या प्रसंगी डॉ.रत्नपारखी यांनी भविष्यातही सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले आश्रम शाळेचे अध्यक्ष माजी आमदार दिगंबर विशे, दैसप सरचिटणीस चंद्रशेखर दाभोळकर, फाऊंडेशनचे सचिव डॉ.राम चव्हाण यांनीही आपली मनोगते व्यक्त केली व आश्रमशाळेच्या कार्याचे कौतुक केले. याप्रसंगी नंदकिशोर वळीवडेकर, विजय पितळे, सुनील देवरुखकर, संजीव वगळ , अजित अमृते,सौ.आरती मालडीकर, विनोद मडकईकर आणि मुरबाड दैवज्ञ समाजाचे अध्यक्ष दिलीप चोणकर ,आश्रम शाळेचे सचिव किशोर पिसाट ,चित्रकार निलेश पिसाट, धोत्रे, पोतदार बंधू आदिअन्यावर उपस्थित होते.
 
 
 
 
 
नजीकच्या गोशाळेला सुद्धा उपस्थितांनी भेट दिली. नंतर मुरबाड येथील दैवज्ञ समाजाच्या पुरातन श्री राम मंदिरात जाऊन सर्वांनी दर्शनाचा लाभ घेतला. मंदिराच्या विश्वस्त व पदाधिकाऱ्यांनी डॉ.गजानन रत्नपारखी यांचा परिषदेचे अध्यक्ष झाल्याबद्दल शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि नामदार नाना शंकरशेट यांची प्रतिमा भेट देऊन सत्कार केला.