जी 20 : ठाकरेंनी आता निवडणुक आयोगात जावं आणि कॉंग्रेस घटनेची कॉपी काढावी!

    06-Dec-2022
Total Views |


जी 20 : ठाकरेंनी आता निवडणुक आयोगात जावं आणि कॉंग्रेस घटनेची कॉपी काढावी!
मुंबई : जी 20 ही जगातील प्रगत आणि विकसनशील देशांची संघटना आहे. 2023 मधील या संघटनेच्या परिषदेचं यजमानपद भारताकडे आहे. या पार्श्वभूमीवर पुढील वर्षभरात अनेक बैठका होणार आहेत. बैठकांच्या आयोजनासंबंधीची एक बैठक नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात काल पार पडली. या बैठकीला अनेक नेत्यांनी हजेरी लावली होती.


महाराष्ट्रातून उ. बा. ठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि अजित पवार हे गैरहजर होते. यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्लीत माध्यमांना प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरेंवर टीका केली. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “देशाच्या हितासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या जी 20 ची बैठक सोडून उद्धव ठाकरे आणि अजित दादा हे राजकीय बैठका घेत होते. उद्धव ठाकरे तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिला आहात, उद्धवजी तुमचं बाळ कुठं गेलं? तुम्ही का उपस्थित राहिले नाहीत परिषदेला? अजित दादा तुम्ही उपमुख्यमंत्री राहिला आहात, तुम्हीही का उपस्थित राहिले नाही परिषदेला?” असा सवाल बावनकुळेंनी केला.
 

“जी-20 सारख्या महत्त्वाच्या बैठकीसाठी शरद पवार जी आणि उद्धवजी यांना रितसर 15 नोव्हेंबर 2022 रोजी निमंत्रण पाठवून, दोनवेळा फोनवर अगत्याने निमंत्रण देऊन सुद्धा त्या बैठकीला न जाता, आजचाच दिवस आपण बैठकीसाठी निवडला, यातून राष्ट्रवैभवाप्रती सुद्धा आपली नियत दिसून आली. राजेशाहीतून लोकशाहीच्या मूल्यांकडे होत असलेल्या या प्रवासाबद्दल त्यांचे अभिनंदन.” अशी टीका त्यांनी यावेळी केली.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.