नागपूर : मुंबई महापालिकेत शिवसेनेच्या कार्यालयावरून काल २८ डिसें. रोजी राडा झाला. त्यावर भाजपा आमदार नितेश राणे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. उ. बा. ठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत नितेश राणे म्हणाले, "शिवसेनेच कार्यालय बाळासाहेबांच्या शिवसेनेचं कार्यालय बाळासाहेबांचा फोटो त्या कार्यालयामध्ये आहे आणि शिंदे साहेबांची शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना आहे म्हणून जे त्यांचा अधिकार आहे ते शिंदे घेणारच. आत्तापर्यंत का घेतलं नाही हा माझा प्रश्न आहे म्हणून जे जे बाळासाहेबांचा आहे, शिवसेनेचं आहे. ते सगळं बाळासाहेबांची शिवसेना आणि त्यांचे कडवट शिवसैनिक म्हणून शिंदे साहेबांच्याकडे गेलं पाहिजे. असं हे सत्य आहे." अशी स्पष्ट भुमिका त्यांनी यावेळी मांडली.
पुढे ते म्हणाले, "उद्धव ठाकरेचा जो छोटासा गट राहिलेला आहे, म्हणून एवढासा वाटी एवढा त्या लोकांनी हे सगळे हट्ट सोडावा आता लहान मुलांसारखं, आता राहिलेलं नाहीये. तुमच्या हातामध्ये आज महापालिका कार्यालय आहे, उद्या जिथे जिथे बाळासाहेबांचा फोटो आहे, जिथे जिथे बाळासाहेब बसायचे ते सगळं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच आहे. त्यांचा अधिकारच आहे आणि स्वतःच्या हक्काचं अगर कोण मागायला गेलं तर चूक काय?" असा थेट सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
"येणाऱ्या काळात दादर येथील शिवसेना भवन यावरती देखील जे जे बाळासाहेबांचं आहे ते ते बाळासाहेबांच्या शिवसेनेचं होणार आणि झालंच पाहिजे त्याच्यावर कोणीही अधिकार माजवू नये असं सरळ स्पष्ट आहे. ज्यांना अधिकार माजवायचा असेल, त्यांनी संघर्षासाठी तयार राहावं. अगर थोडी मनगटात ताकद असली तर... हे पॅन्टीतले बॉम्ब आहेत हे पँटीतच फुटतात आणि हाजीमुला खाऊन मोकळे होतात. म्हणून त्यांना काय तुम्ही महत्व देऊ नका. " असं नितेश राणे म्हणालेत.