नागपूर : केईएम, नायर रुग्णालयातील ढिसाळ कारभाराबाबत आज अधिवेशनात आ. अतुल भातखळकरांनी मुद्दा उपस्थित केला. महानगरपालिकेच्या अधिपत्याखालील नायर आणि केईएम ही फार महत्वाची आणि मोठी रुग्णालये आहेत. या दोन्ही ठिकाणची मशीनही कित्येक महिन्यापासून बंद आहेत. आणि त्याच्यामुळे खाजगी एमआरआय चालवणारे लोकं त्याठिकाणी येणाऱ्या गरीब लोकांची लूटमार करतायेत. असा खुलासा त्यांनी यावेळी केला.
पुढे ते म्हणाले, "केईएम रुग्णालयामध्ये रोज हजारो रुग्ण येतात. परंतु एमआरआय मशीन आणि सीटी स्कॅन मशीन गेल्या सहा महिन्यापासून बंद आहे. मी सातत्यानं प्रयत्न करतोय. प्रत्येक वेळी आयुक्त सांगतात की निविदा प्रक्रिया सुरु आहे. तर मी विनंती करतो की, निविदा काढा. काही करा. परंतु लवकर लवकर हे एमआरआय मशीन आणि सीटी स्कॅन मशीन नवीन बसवा." अशी मागणी त्यांनी यावेळी केली.