कर्नाटकव्याप्त महाराष्ट्राला तातडीने केंद्रशासित करा! : उद्धव ठाकरे

    27-Dec-2022
Total Views |

उध्दव ठाकरे
कर्नाटकव्याप्त महाराष्ट्राला तातडीने केंद्रशासित करा! 
नागपूर : उबाठा सेना प्रमुख उद्धव ठाकरे दि.26 डिसेंबर रोजी विधान परिषदेतील भाषणात म्हणाले की,महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद प्रश्न हा सर्वोच्च न्यायालयात बरीच वर्ष प्रलंबित आहे. अशावेळी दोन्ही राज्यांनी संयम दाखवणे गरजेचे आहे. मात्र तो संयम कर्नाटककडून दिसत नाही. आज ही कर्नाटकमधील मराठी भाषिकांवर कानडी भाषेचा अत्याचार सुरू आहेत. असेही उध्दव ठाकरे म्हणाले. त्यामुळे कर्नाटकव्याप्त महाराष्ट्राला तातडीने केंद्रशासित करा अशी मागणी ठाकरेंनी केली.
तसेच उध्दव ठाकरे यांनी विधान परिषदेतील सभापती यांच्याकडे 'केस फॉर जस्टीस' नावाची डॉक्युमेंटरी फिल्मचे पेनड्राईव्ह दिले आहे. त्या फिल्ममध्ये कर्नाटकात मराठी भाषा किती वर्षापासून वापरली जाते.यांचे पुरावे असल्याचे उध्दव ठाकरेंनी सांगितले. त्याचबरोबर ठाकरेंनी माजी मुख्यमंत्री बॅ. अंतुले यांचे 'महाजन रिपोर्ट अनकव्हर्ट' हे पुस्तक ही सभापतींकडे दिले.
 
 
मराठी माणसाने कन्नड भाषिकांवर कधीच अत्याचार केले नाहीत, ना महाराष्ट्र सरकारने. कर्नाटक सरकारने मात्र मराठी भाषिकांवर अत्याचार केले, असे ही उध्दव ठाकरे म्हणाले. त्यामुळे मराठी भाषिकांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी कर्नाटकव्याप्त महाराष्ट्राला तातडीने केंद्रशासित करा,अशी मागणी ठाकरेंनी केली
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.