गिरीश बापट आणि शरद पवारांच्या भेटीबाबत सोमय्या म्हणाले...

    27-Dec-2022
Total Views |
 
 
 
गिरीश बापट आणि शरद पवारांच्या भेटीबाबत सोमय्या म्हणाले...
मुंबई : राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे आज पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या भेटीसाठी गेले होते, पुण्याचे खासदार गिरीश बापट हे गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत आहे. शरद पवार हे गिरीश बापट यांच्या भेटीसाठी जात असतांना त्याच ठिकाणी काही मिनिटे आधी भाजपचे खासदार किरीट सोमय्या हे देखील रुग्णालयात पोहचले होते. त्याच वेळी शरद पवार येणार असल्याचे कळताच किरीट सोमय्या हे थांबून राहिले होते.
 
 
शरद पवार आल्यानंतर दोघेही गिरीश बापट यांच्या भेटीसाठी गेले. तरी भेटीनंतर बाहेर आल्यानंतर किरीट सोमय्या यांनी माध्यमांना दिलेली प्रतिक्रिया चर्चेचा विषय ठरत आहे. गिरीश बापट यांच्या भेटीदरम्यान काय घडलं आणि शरद पवार यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. असं सोमय्या यावेळी म्हणाले.
 
 
पुढे ते म्हणाले, "गिरीश बापट यांची प्रकृती पाहण्यासाठी आम्ही आलो होतो.शरद पवार साहेब हे येणार आहेत म्हणून मी थांबलो होती, शरद पवार यांचे एक वेगळे स्थान आहे त्यांचा नेहमीच आम्ही आदर करतो.शरद पवार यांच्या कडून सगळ्या राजकारण्यांनी एक गुण घेण्यासारखा आहे , मी देखील त्यांच्याकडून एक गुण घेतला आहे. पवार साहेब यांनी बापट साहेब बद्दल खूप विचारपूस केली.आम्ही आत गेलो, बापट पेरू खात होते आणि लगेच शरद पवार यांनी पेरुवर चर्चा केली, गिरीश बापट यांना शरद पवार म्हणले,लवकर संसदेत या असं किरीट सोमय्या यांनी सांगितले आहे.याशिवाय माध्यम प्रतिनिधी यांनी तुम्हाला पवार साहेब म्हणाले का ? संसदेत या असं असं विचारले त्यावर सोमय्या यांनी माझं काम मी केलं यांचे सरकार घरी बसवले आहे. अशी प्रतिक्रिया दिली.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.